नागपूर,
Dussehra विजयादशमीला प्रभूरामचंद्रांनी रावणाचा अंत केला. असत्यावर सत्याचा विजय प्रस्थापित करतानाच वाईटाचा नाश करण्यासाठी प्रतिकात्मक रावणदहनाची माेठी परंपरा उपराजधानीत आजही जपली जाते. विशेष म्हणजे अनेक पिढ्यांपासून रावण तयार करणाऱ्या बिनवार कुटुंबाने ही परंपरा कायम ठेवली आहे. महालातील गांधीगेट परिसरात दशमुखी रावण तयार करण्यासाठी शेकडाे हात कामाला लागले आहे.
यंदा २ ऑक्टाेबरला दसरा सणाला विविध ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन हाेणार आहे. त्यासाठी पुतळे तयार करणारे अमर सिंह बिनवार यांनी तरुण भारत समाेर या निर्मितीचे अंतरंग उलगडले. ते म्हणाले, ५० ते ६० फुट उंच रावण तयार केले जातात. त्यासाठी चार महिन्यांपूर्वीपासून आम्ही तयारीला लागताे. यासाठी माेठ्या प्रमाणात बांबू, रेडियम पेपर, काॅटन धागा, तार, मैदा, माेरचूद, Dussehra घाेटीव पेपर यासह इतरही साहित्याचा उपयाेग केला जाताे. चेहरा, धड, लेहंगा आणि पाय असे चार भाग वेगवेगळे तयार करून नंतर ते रावणदहन हाेणार असलेल्या जागेवर जाेडले जातात. त्यामुळे कस्तुरचंद पार्क, कृष्णनगर, बालाजीनगर, सक्करदरा, दत्तवाडी काटाेल, काेंढाळी आदी भागात ५० फुटाएवढे रावण उभारण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत असल्याचे बिनवार सांगतात
रावणाला महागाईची झळ
बिनवार सांगतात, गेल्या काही वर्षांत रावण तयार करण्यासाठी लागणाèया साहित्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. जवळपास २० ते ३० टक्क्यांनी हे साहित्य महागले आहे. त्यामुळे रावण निर्मितीलाही महागाईची झळ साेसावी लागत आहे.
वडिलांचा वसा पुढे नेण्यासाठी घडपड
अमर सिंह बिनवार यांच्या वडिलांनी सर्वप्रथम नागपुरात रावणदहनासाठी प्रतिकात्मक पुतळे तयार करण्याला सुरुवात केली. त्या काळी गांधीगेट पासूनचा परिसर पुतळ्यांची भरलेला असायचा. त्याकाळी वेगवेगळे पुतळे तयार करण्यात त्यांचा हातखंडा हाेता. त्यांनीच या व्यवसायाला वेगळी ओळख दिली. त्यांचा वसा पुढे नेण्यासाठीच आम्ही घटत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कलावंत म्हणून सन्मान मिळेल का
रावणाचे महाकाय Dussehra पुतळे तयार करणे ही कला आहे. ही कला आम्ही अनेक पिढ्या जपत आलाे आहे. ती टिकावी यासाठी शासनानेही आमच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कलावंत म्हणून आम्हाला सन्मान मिळेल का असा प्रश्नही अमर बिनवार उपस्थित करतात.