दुर्गामाता मंदिरात ८५१ अखंड ज्योती

01 Oct 2025 13:37:39
नागपूर,
Suyog Nagar सुयोग नगर येथील श्री दुर्गामाता मंदिरात माँ हरसिद्धीच्या आशीर्वादाने नवरात्रीच्या निमित्ताने विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उज्जैन येथील प्रसिद्ध हरसिद्धी माता शक्तिपीठातून आणलेली अखंड ज्योती येथे विधिवत प्रज्वलित करण्यात आली.
 

joti 
 
 
मंदिर प्रांगणात ८५१ अखंड ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या असून, सकाळ-संध्याकाळ नियमित आरती व प्रसाद वितरणाने भक्तिभावाचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने श्रद्धाळू कुटुंबासह मंदिरात येऊन माता राणीचे दर्शन घेत आहेत.मंदिर समितीच्या माहितीनुसार,Suyog Nagar हा पावन सोहळा संपूर्ण नवरात्री पर्वभर सुरू राहणार असून, श्रद्धाळूंना कुटुंबासह सहभागी होऊन माता राणीच्या आशीर्वादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य:सुनील गव्हाणे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0