संज्ञा चैतन्य संस्थेमधील मुलांची भजन सेवा

01 Oct 2025 17:21:24
नागपूर,
Venkatesh Nagar Nagpur व्यंकटेश नगर, खामला येथील श्री व्यंकटेश मंदिरात नवरात्री भजन कार्यक्रमांतर्गत संज्ञा चैतन्य प्रौढ मतीमंद कार्यशाळेतील विशेष प्रौढ मुलामुलींनी रोजी भजन व भक्तिगीतांची सेवा अर्पण केली.या विशेष विद्यार्थ्यांनी निरागसतेने आणि निर्मळ मनाने गायलेली गीते उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. समाजाच्या सहकार्यामुळे आणि संवेदनशीलतेमुळे हा उपक्रम एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरला.

diva 
 
 
व्यंकटेश नगरातील नागरिकांनी या विशेष मुलांना दिलेले सहकार्य प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे. समाजाने दाखवलेला हा विश्वास समानता व प्रेमाने एकत्र जगण्याचा संदेश देणारा ठरला.या कार्यक्रमात अमित पटले, विनया बेडेकर, सई नागदेव, नेहा जालन, सिद्धी, शुभदा व आदित्य दामले, वेदा टोकेकर, रोहिणी मराठे, दीपक तिवारी, आदित्य श्रीखंडे, आभास लोखंडे, निखिल गोखले, श्रीहरी, निनाद कोरान्ने,Venkatesh Nagar Nagpur पंकज चतुर्वेदी आणि केतन अभ्यंकर या विद्यार्थ्यांनी गायनाची मेजवानी दिली.संस्थेचे अध्यक्ष शेखर दामले म्हणाले, “नवरात्र भजन कार्यक्रम समाजातील समरसता आणि भक्तीचा आदर्श नमुना ठरावा. या विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम पुढेही घडावेत.”या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य:भाग्यश्री दिवाण,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0