रा. स्व. संघाचा आज भव्य विजयादशमी उत्सव

01 Oct 2025 19:39:06
नागपूर,
Vijayadashami रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव उद्या 2 ऑक्टोबरला रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संघाच्या कार्याला 100 वर्षे पूर्ण होत असून शताब्दीनिमित्ताने स्वयंसेवकांमध्ये आगळा उत्साह आहे. सकाळी 7.40 वाजता आयोजित या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे रहातील. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रमुख उद््बोधन होईल. या कार्यक्रमात देश-विदेशातून गणमान्य व्यक्तीसहभागी होतील. त्यातभारतीय लष्कराचे माजी प्रमुख (ऑफिसर कमांडिंग इन चीफ) लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता, डेक्कन इंडस्ट्रिज कोयंबतूचे व्यवस्थापकीय संचालक के के. वी. कार्तिक व त्यांचे कुटुंबीय, बजाज फिनसर्वचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, उपस्थित राहतील. शिवाय घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलँड, इंग्लंड, अमेरेकेतूनही पाहुणे येत आहेत.
 
 
 
 
Vijayadashami
 

 
नागपुरातील 20 हजार पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवक, अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपींसह इतर देशातील स्वयंसेवक, नागरिकांसह एकूण 25 ते 30 हजारांची उपस्थिती राहिल, हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.रेशीमबाग मैदानाच्या दक्षिणेला उत्तराभिमुख मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 1 हजार आसनांचे दोन डोम तयार करण्यात आले आहेत. तिघांची रचना समान आहे. मैदानाच्या पश्चिमेला पुर्वाभिमुख चार विस्तीर्ण शामियाने, उत्तरेला खुर्च्या तसेच पूर्वेलाही आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
माजी राष्ट्रपतींसह अनेक अतिविशिष्ट मान्यवर उपस्थित राहणार असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. वाहनांना कार्यक्रम स्थळापासून दूर ठेवावे लागणार आहे. त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था
तुळशीबाग झोन 1
पी-1 - लोकांची शाळा (कार पार्किंग), पी-2 नव भारत विद्यालय (दुचाकी), पी-3 सरस्वती मंदिर, तुळशीबाग (दुचाकी), पी-4 साने गुरुजी शाळा, राहतेकर वाडी (दुचाकी), पी-5- रहातेकर वाडी पगारिया मैदान फक्त पत्रकारांसाठी (मेहंदी लॉनसमोर)(दुचारी व चारचाकी), पी-6 सी.पी. अ‍ॅण्ड बेरार कॉलेज (दुचाकी), पी-7तुळशीबाग सी.पी. अ‍ॅन्ड बेरार कॉलेजसमोरील मैदान (चार चाकी).
 
 

ग्रेट नाग रोड झोन-2
पी-8 -रवींद्र अध्यापक विद्यालय व राधा महाविद्यालय (दुचाकी), पी-9- जामदार हायस्कूल (दुचाकी), पी-10 रतन कॉलनी मैदान, सोनबाजीची वाडी (दुचाकी), पी-11 छत्रपती विद्यालय (दुचाकी), पी-12-अ.कु. समाज सभागृह (दुचाकी), पी-14 स्वामी सीतारामदास विद्यालय दुचाकी)
रेशीमबाग झोन -3
पी-15- एनआयटी मैदान महावीरनगर (दुचाकी /चार चाकी), पी-16- सुरेश भट सभागृह (दुचाकी/ चार चाकी), पी-18 व्हीनस व्हॉलिबॉल ग्राऊंड (दुचाकी), पी-19- रेशीमबाग पाणी टाकी (दुचाकी)
 
हनुमान नगर झोन-4
पी-20-एसबीसीटी महाविद्यालय (चारचाकी), पी-21- जैन कलार भवन (दुचाकी), पी-22-  महात्मा फुले सभागृह (दुचाकी), पी-23- प्रेरणा महाविद्यालय (दुचाकी), पी-24- समाज कल्याण वसतिगृह (दुचाकी/चार चाकी), पी-25- बजाज आयुर्वेदिक (दुचाकी), पी-26- ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय (चार चाकी), पी-27 चौकोनी मैदान, हनुमाननगर (बस/मोठी वाहनेे), पी-28 (बस/मोठी वाहने).
 
 
नागरिकांनी आपल्या घरापासून जवळ असलेल्या वाहन तळावरच वाहने ठेवावीत. दिव्यांग व शारीरिक अस्वस्थांसाठी वाहन तळ ते कार्यक्रम स्थळ वाहन व्यवस्था राहील. दिव्यांग आणि वृद्धांसाठी प्रवेशद्वार 2 व 3 च्या डावीकडे स्वतंत्र व्यवस्था राहील.
Powered By Sangraha 9.0