तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Yavatmal emergency flood preparedness यवतमाळसह आजूबाजूच्या जिल्ह्यांत बèयापैकी पर्जन्यवृष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री, पालकमंत्री संजय राठोड व सचिव, आयुक्त आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूरग्रस्त रुग्णांसाठी आपत्कालीन व्यवस्था अद्यावत ठेवण्यात आली आहे.
पूरसदृश्य परिस्थितीत पूर्वप्रभावित रुग्ण व पुरानंतर होणारे डेंग्यु, मलेरिया, लेप्टोपायरोसिस, टायफॉईड यासारखे आजार उद्भवल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी तयारी रुग्णालयात ठेवण्यात आली आहे. त्यासाठी लागणारी औषधे व तत्सम साहित्याचा पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे.
पूरग्रस्त रुग्णांना आवश्यक असलेले औषध उपचार करण्याकरता अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनात औषधशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके व त्यांचे पथकप्रमुख डॉ. गणेश जाधव, डॉ. शेखर घोडेस्वार, डॉ. चंद्रशेखर धुर्वे आणि औषधशास्त्र विभागातील डॉक्टर्स आणि परिचारिका कार्यरत आहेत.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमर सुरजुसे, डॉ. दुर्गेश देशमुख आणि डॉ. अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात आकस्मिक विभागाचे वैद्यकीय अधिकारी वेळोवेळी आवश्यक ती लागणारी व्यवस्था बघत आहे.