तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Yavatmal Zilla Parishad notice जिल्हा परिषदेतील शिक्षक, अधिकारी आणि इतर कर्मचाèयांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली. यात ऑफलाईन प्रमाणपत्र सादर केलेल्या 65 कर्मचाèयांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. काही गैरहजर असलेल्या कर्मचाèयांवरसुद्धा वेगळी कारवाई केल्या जाणार आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अनुषंगाने दिव्यांगाचे सक्षमीकरण करणे, तसेच अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अभिप्रेत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम, समाज कल्याण यासह महाराष्ट्रातील सर्वच विभागांतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले आहेत.
त्यावरून यवतमाळ जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. 447 कर्मचाèयांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. यात 382 ऑनलाईन प्रमाणपत्र आढळले.