नागपूर,
Nagpur weather : पश्चिम विदर्भ उत्तर मध्य महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दसर्याच्या दिवशी पावसाची हजेरी लागल्यास शहरातील विविध कार्यक्रमाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
नवरात्री उत्सवाच्या निमित्त्याने अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने गैरसोयींचा सामना करावा लागला. परतीच्या पावसाने नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नागपूर जिल्ह्यात यंदा १००४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही सरासरीपेक्षा तब्बल ८ टक्के अधिक आहे. तर विदर्भात १०४५.२ मिमी पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा १२ टक्के जास्त आहे. सरासरी ९२९.४ मिमी पाऊस होतो.