माधवी भूत यांचे कथामाध्यमातून स्त्रीशक्तीचे दर्शन

01 Oct 2025 17:50:35
नागपूर,
Zenda chouk Dharampeth श्री दुर्गामाता नवरात्री उत्सवा निमित्त झेंडाचौक, धरमपेठ येथील माता मंदिरात माधवी भूत यांनी “ती... देवी शक्तीचे आधुनिक रूप” या विषयावर कथा सादर केली.आपल्या दैनंदिन व्यवहारातील घटनांमधून स्त्रीशक्ती कशी कार्यरत असते, कुटुंब, मुलाबाळं आणि समाजाच्या उन्नतीसाठी तिचा त्याग व प्रयत्न हेच देवीच्या आधुनिक रूपाचे दर्शन घडवतात, हे त्यांनी कथांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
 

101 
 
देवीच्या नऊ रूपांचा संदर्भ त्यांनी अध्यात्मिक आणि आधुनिक जीवनाशी जोडून सांगितला. स्त्रीशक्तीची ही उदाहरणे समाजात आदर्श प्रस्थापित करणारी असून शक्तीची उपासना आपल्याला अपूर्णतेतून पूर्णत्वाकडे नेते,Zenda chouk Dharampeth असेही त्यांनी प्रतिपादन केले.या कार्यक्रमात स्वागत अंजली गोगटे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुरेखा देशपांडे यांनी केले.
सौजन्य:स्वाती सुरंगळीकर,संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0