विश्वसंचार
मल्हार कृष्ण गोखले
Gazapatti War १९३६ सालची गोष्ट. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौर्यावर गेलेला होता. गबी अॅलन हा जलदगती गोलंदाज इंग्लंडचा कर्णधार होता. तो भयंकर शिवराळ होता. त्याच्या गोलंदाजीवर चौकार किंवा मारणार्या फलंदाजाला तो बेधडक अत्यंत गलिच्छ शिव्या देत असे. यात दुहेरी उद्देश असायचा. एक म्हणजे ‘माझ्या चेंडूवर चौकार मारतोस काय?’ म्हणून सरळच शिवी घालणे. दुसरा वाकडा उद्देश म्हणजे, अशा शिव्या ऐकून फलंदाजाने भडकावे. त्याची एकाग्रता ढळावी. त्याने रागाने आडव्या बॅटने चेंडूला झोडपावे आणि त्यात त्याची विकेट पडावी.
हा प्रयोग भारतीय फलंदाजांवरही सुरू केला. महान भारतीय फलंदाज कर्नल सी. के. नायडू हे अत्यंत अनुभवी होते. ते अत्यंत शांत राहिले. पण दुसर्या बाजूला होता लाला अमरनाथ. सळसळत्या, उसळत्या रक्ताचा दणकेबाज फलंदाज. लालाने गबीच्या चेंडूवर खाडकन चौकार मारावा आणि गबीने शिव्यांची लाखोळी व्हावी, असे लागोपाठ दोनदा झाले. तिसर्यांदा लालाने एक जबरदस्त ठोकला. लगेच गबी अॅलनच्या तोंडाची गटारगंगा वाहू लागली. लालाने आपल्या जागेवरूनच गबीच्या दुप्पट आवाज चढवून चौपट शिव्या घातल्या. मात्रा अचूक लागू पडली. गबी गप्प बसला. परत त्याने तोंड उघडले नाही. नॉन स्ट्रायकर एंडला उभे असलेल्या सी. के. नायडूंना हसू आवरता आवरता पुरेवाट झाली. लक्षात घ्या. ते १९३६ साल होते. गुलाम भारतीयाने इंग्लंडच्याच भूमीवर इंग्लंडच्या खुद्द कप्तानाला भर मैदानावर शिव्या घालणे, हे सोपे साहस नव्हते. खरी मज्जा तर पुढेच आहे. तंबूत परतल्यावर भारतीय संघातल्या सहकारी खेळाडूंनी लालाला विचारले, ‘पण तू काय बोललास त्याला?’ त्यावर लाला उतरला, ‘हे बघा मित्रांनो, मला काही तुमच्या इतके फाडफाड इंग्लिश येत नाही. तो समोरून शिव्या देतोय, एवढेच मला कळले. मला काही इंग्लिश शिव्या येत नाहीत. मी त्याला माझ्या मातृभाषेत, पंजाबीत, चांगल्या अस्सल आणि कचकचीत शिव्या हासडल्या. तो गप्प बसला.’ सी. के. नायडू सर्वांना म्हणाले, ‘बॉईज, यावरून महत्त्वाचा धडा घ्या. तुमची भाषा, तुमचे शब्द, यापेक्षा तुमचा आवेश समोरच्याला बरोबर समजतो.’ दॅट इज द स्पिरिट!
Gazapatti War सालचा अत्यंत गाजलेला चित्रपट ‘शोले.’ नुकतीच त्याची पन्नाशी साजरी झाली. ‘मॅग्निफिसन्ट सेव्हन’ आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट’ या दोन वेस्टर्न चित्रपटांकडून मुख्यतः शोले उचललेला आहे. पण इतरही अनेक वेस्टर्न चित्रपटांमधली छोटी-छोटी दृश्ये त्यात फार खुबीने बसवलेली आहेत. तसाच एक प्रसंग- रामगढ गावचा एक तरुण पोरगा (अभिनेता गब्बर सिंगच्या हातात सापडतो. गब्बर त्याला ठार मारतो. घोड्यावरून त्याचे प्रेत रामगढला पाठवतो आणि बरोबर चिठ्ठी पाठवतो की, वीरू आणि जय (अनुक्रमे धर्मेंद्र आणि अमिताभ) यांना माझ्या ताब्यात द्या. नाहीतर मी संपूर्ण रामगढ गाव बेचिराख करून टाकेन. त्यावर वीरू आणि जय मोठ्या युक्तीने आणि बहादुरीने गब्बरच्या चार गुंडांना ठार आणि पाचव्या जखमी गुंडाबरोबर गब्बरला चिठ्ठी पाठवतात- ‘तुम एक मारोगे, तो हम चार मारेंगे.ङ्ख दॅट इज द स्पिरीट!
१९२१ सालानंतरचा काळ. पॅलेस्टाईन हा प्रदेश तुर्कस्तानच्या साम्राज्यातून काढून इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. राजकीय भाषेत त्याला म्हणायचे- ‘ब्रिटिश प्रोटेक्टोरेट.ङ्ख या भागातले स्थानिक लोक होते पॅलेस्टाईनी अरब. प्रख्यात ज्यू नेते डेव्हिड बेन यांनी ही संधी झडप मारून उचलली. ते स्वतः जेरुसलेमला आले आणि देशोदेशींच्या ज्यू धर्मीयांना आवाहन केले, ‘या आणि आपल्या पूर्वजांच्या या पवित्र भूमीत स्थायिक व्हा. १८०० वर्षांनंतर ज्यू लोकांना त्यांच्या पवित्र मायभूमीत परतण्याची संधी मिळाली आहे. ती सोडू नका.’
Gazapatti War त्यांच्या या आवाहनामध्ये फार मोठे भवितव्य दडलेले होते. जेव्हा केव्हा हा प्रदेश सोडतील, त्यावेळी या भूमीत ज्या समुदायाची लोकसंख्या जास्त असेल, तोच समुदाय या भूमीचा सत्ताधारी होईल. आज या भूमीत अरब जास्त आहेत. त्यांच्यापेक्षा ज्यूंची संख्या जास्त झाली तरच १८०० वर्षांनंतर ज्यूं ना त्यांच्या मूळ भूमीत राज्य करता येईल. देशोदेशींचे मुख्यतः युरोपीय देशांमधले ज्यू समूह मोठ्या संख्येने पॅलेस्टाईनमध्ये येऊन लागले. अरबांना हे इंगीत कळल्यावर त्यांनी सरळ-सरळ सशस्त्र दंगे सुरू केले. बेन गुरियान यांना हे अपेक्षितच होते. त्यांनी अरबांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली.
त्या काळात घडलेली एक घटना. मुसलमानांना स्त्री ही उपभोगाची वस्तू वाटते. ते स्त्रीला ‘माणूस नव्हे तर ‘वस्तू’ समजतात. जेरुसलेममध्ये रोज नवीन येऊन थडकणार्या युरोपीय ज्यू महिला पाहून अरबांच्या तोंडाला पाणी सुटले. अगदी लाळ गळून वाळवंटात झिरपू लागली. जेरुसेलमच्या रस्त्यांवर ज्यू महिलांची छेडछाड झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. विषय बेन गुरियान यांच्यापर्यंत पोचला. त्यांनी नवागत ज्यू महिलांपैकी काही निवडक बायका उचलल्या. त्यांना हत्यारे चालवण्याचे प्राथमिक शिक्षण दिले आणि सांगितले, ‘छेडछाड झाली तर बेधडक ही हत्यारे ब्रिटिश पोलिसांचे काय ते आम्ही पाहू.’ आणि मग जेरुसलेमच्या रस्त्यांवर अरबांचे बारा-पंधरा मुडदे पडले. फार नाही, बारा-पंधराच. ताबडतोब लंपटपणा आटोक्यात आला. गोरी चामडी बघून तोंडातून गळणारी लाळ, तोंडातच जिरली. दॅट इज द स्पिरिट!
इथे लगेचच स्पष्ट करतो की, ही घटना मला कोणत्याही पुस्तकात, चरित्रात, इंटरनेटवर मिळालेली नाही. ज्याचे नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झालेत, अशा एक मराठी ज्यू माणसाकडून मी ती तोंडी ऐकलेली आहे. म्हणजेच ऐतिहासिक शास्त्रीयदृष्ट्या ती विश्वसनीय नाही, असे म्हणता येईल. नसेलसुद्धा विश्वसनीय कदाचित. पण तिच्यातला आवेश, ते स्पिरीट महत्त्वाचे आहे.
७ ऑक्टोबर २०२३ चा दिवस. संपूर्ण इस्रायल देश दुसर्या दिवशी असणार्या ‘सिम्हथ तोराह’ या ज्यू धर्मीय सणाच्या मग्न होता. गाझापट्टीजवळच्या रीम या परिसरात ‘सुपरनोव्हा सुक्कोथ गॅदरिंग’ या नावाचा भव्य संगीत जलसा सुरू होता. किमान ३ हजार ज्यू नागरिक तिथे संगीताचा आस्वाद घेत होते. अचानक ‘हमास’ या अरब अतिरेकी संघटनेचे २५०० कडवे दहशतवादी रीमवर तुटून पडले. बेछूट, अंदाधुंद गोळीबार करत त्यांनी किमान १४०० लोकांना ठार मारले. गाझापट्टी इस्रायल यांच्या सरहद्दीवरच्या नेटिव्ह-हा-असरा, बीरी, होलित, कफ्र आझा आणि नीर ओझ या ज्यू गावांवर ५००० अग्निबाणांचा वर्षाव करण्यात आला. पाठोपाठ अतिरेक्यांनी तिथे प्रत्यक्ष आक्रमण करून असंख्य लोकांना ओलिस धरले. स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात आले. लहान मुलांचे शिरच्छेद करण्यात आले. गर्भवती स्त्रियांची पोटे फाडून त्यांचे गर्भ बाहेर ओढून त्या स्त्रिया आणि ते गर्भ यांच्या माना चिरण्यात आल्या.
ही बातमी येताक्षणी इस्रायली संरक्षण मंत्र्याने संपूर्ण गाझापट्टीला वेढा घातला आणि जाहीर केले, ‘गाझापट्टीत जाणारी वीज, पाणी, अन्नधान्य, औषधे, माणसे सर्व काही बंद. आम्ही माणसाचे देह असणार्या जनावरांशी लढत आहोत.’
येत्या ७ ऑक्टोबरला या घटनेला दोन वर्षे पूर्ण होतील. Gazapatti War गाझापट्टीत युद्ध सुरूच आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कुणाच्याही दबावाला जराही भीक न घालता गाझापट्टीतल्या हमासच्या लोकांना रगडून काढणे जारीने चालू ठेवले आहे. गेल्या दोन वर्षांच्या या संघर्षात इस्रायलचे नागरिक आणि सैनिक मिळून सुमारे दोन हजार लोक ठार झालेत. शिवाय २५१ लोक अजूनही हमासच्या ताब्यात ओलिस आहेत तर गाझापट्टीतल्या नागरिक आणि सैनिक मिळून ८८ हजार लोक ठार झालेत. म्हणजे हे प्रमाण एकास चार नव्हे, तर एकास चव्वेचाळीस पडते.
३० सप्टेंबर २०२५ या दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्या यांनी हमाससमोर २० कलमांचा एक शांतता प्रस्ताव ठेवला आहे. आता निर्णय हमासने घ्यायचा आहे.
(लेखक प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत.)