लोकायन
सुधीर पाठक
Sangha gita- sangha prarthana राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना तसेच संघ गीतातील काही मोजकी २५ गीते या ठेवा नवस्वरूपात मांडण्याचा, तो श्रवण करण्याचा एक सुखद अनुभव नागपूरकरांना घेता आला. हा सुखद नवाविष्कार होता ख्यातनाम गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या आवाजात संघ गीते व संघ प्रार्थना ऐकायचा. वास्तविक हे दोन भिन्न कार्यक्रम होते. या दोन्ही कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित होते.

Sangha gita- sangha prarthana संघाची ही प्रार्थना ला सिंदी येथे झालेल्या बैठकीत स्वीकारली गेली. नागपूरचे ख्यातनाम संस्कृत पंडित व न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक नरहर भिडे यांनी ती शब्दबद्ध केली आहे. त्यासाठी तत्कालीन संस्कृत पंडित वेदमूर्ती ताम्हण या त्यांच्या गुरूचे मार्गदर्शनही त्यांना मिळाले होते. ही प्रार्थना संगीतबद्ध करून सर्वात प्रथम एप्रिल ४० मध्ये पुण्यातील एका संघवर्गात यादवराव यांनी म्हटली होती. संघात रोजच ही प्रार्थना लीड व फॉलो या तत्त्वानुसार म्हटली जाते. एक जण प्रार्थनेची एक ओळ सांगतो आणि सर्वजण कोरसने ती ओळ पुन्हा म्हणतात. पद्मश्री शंकर महादेवन यांनी ही प्रार्थना सांगितली आहे आणि त्याच्या फॉलोमध्ये त्याचे भाषांतर करून ख्यातनाम व्यक्तींनी त्या त्या ओळीचा अर्थ वेगवेगळ्या भाषेत आहे. हिंदीमध्ये प्रार्थनेचा अर्थ हरीश भिमानी यांनी शब्दबद्ध केला आहे व त्यांनीच तो वाचूनही दाखवला आहे तर मराठीतील ख्यातनाम सिनेनट सचिन खेडेकर यांनी मराठीत त्याचे वाचन केले आहे. जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये या प्रार्थनेचे रूपांतर करण्याची कल्पना आहे. आठ-दहा भाषांमधील प्रार्थनेचे हे रूपांतर सिद्धही झाले आहे.
मुळातून ही कल्पना उद्घोषक हरीश भिमानी यांची. त्यावर संगीताचा साज चढविला आहे राहुल रानडे यांनी. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी खूप मेहनत केली व त्याला चितळे समूहाचे इंद्रनील चितळे यांचे मोठे योगदान लाभले आहे. राहुल रानडे हे ख्यातनाम संगीतकार म्हणून मराठी भाषकांना ज्ञात आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट ऑर्केस्ट्रा म्हणून रॉयल फिलान मिनिट ऑर्केस्ट्राचा वापर केला आहे. या भागाचे रेकॉर्डिंगही लंडनला झाले.
ज्यावेळी या प्रकल्पाची कल्पना हरीशजींनी सांगितली आणि प्रार्थनेचा हिंदी भावानुवाद त्यांनीच केला; त्याचे वाचनही केले. वेस्टर्न फ्युलोमिकचा वापर वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचे कोंदण देण्याचा हा प्रयास होता, पण संघाला हे मान्य होईल का हा खरा प्रश्न होता आणि सर्व प्रकार सर संघ चालक डॉ. मोहन भागवत यांना सांगितले गेले. त्यांनी उत्तम करूया या शब्दांत आशीर्वाद दिला. तत्पूर्वी संघाचे पश्चिम क्षेत्रिय प्रचारक सुमन्त जी आमशेकर, पुण्याचे संस्कार भारतीचे दादा गोखले यांचीही मंजुरी वजा शिफारस घ्यावी लागली.
Sangha gita- sangha prarthana वेस्टर्न संस्था ट्रॅकबाबत बोलताना राहुल रानडे म्हणाले, मुळातून संघाची प्रार्थना ही ब्रिटिशांविरुद्ध करताना निर्माण झालेली आहे. त्या ब्रिटिशांच्या वादकांनी ही प्रार्थना लिपीबद्ध करून लंडनमध्येच वाजवावी हा एक आगळा योग आहे. त्यांच्या या कथनाला भरपूर टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात एकूण तीन वेळा प्रार्थना म्हटली गेली. हिंदीत भीमानी, मराठी सचिन खेडेकर यांनी अर्थ वाचन केले, तर तिसरी चित्रफीत ही सामूहिक प्रार्थना गायनाची सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून अतिशय मोजक्या शब्दात पण नेमकेपणाने या प्रकल्पाचे कौतुक केले. संघाच्या प्रार्थनेत भाव हा महत्त्वाचा गाभा आहे आणि तो व्यवस्थित पोहोचवला गेला आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. संघात येणारे अगदी शिशु व बाल संघ स्वयंसेवक ही शाखांमध्ये मस्ती करून त्या शिक्षकांच्या नाकात दम आणतात. त्यांच्या उत्साहाला कसे हा प्रश्न त्या शिक्षकांसमोर कायम असतो, पण तो मस्तीखोर शिशु स्वयंसेवक प्रार्थना सुरू झाली की अगदी डास चावत असला, तरी आपला पाय हलवत नाही, ना पायाला हात लावत. त्या क्षणात तो शिशु स्वयंसेवक ही प्रार्थना त्याच्या शैलीने जगत असतो. हीच बाब पुढे नेताना मोहनजी पुढे म्हणाले- एकदा कलकत्ता येथे प्राथमिक शिक्षक रस्त्याने जात होते. संध्याकाळची वेळ होती आणि काही बाल स्वयंसेवक एका शाखेत प्रार्थना म्हणत होते. रस्त्याने जाताना त्या शिक्षकांच्या कानावर ते शब्द पडले; तो भावही त्यांना खूप भावला. शब्द तर खूपच आवडले. ते त्या मुलांजवळ गेलेत आणि म्हणाले, ‘‘मुलांनो, तुम्ही कोण आहात आणि आता काय म्हणत होता.’’ उत्तर आले, ‘आम्ही संघ स्वयंसेवक आहोत आणि संघाची प्रार्थना म्हणत होतो.’ पुढे ते शिक्षक या प्रार्थनेमुळे संघात इतके गुंतले आणि संघमय झाले की ते बंगाल प्रांताचे संघचालकही झाले.
संघ स्वयंसेवक जशी Sangha gita- sangha prarthana प्रार्थना करतो तशीच प्रार्थना शंकर महादेवन यांनी म्हटली आहे, अशी पसंतीची पावतीही डॉ. मोहनजी भागवत यांनी देऊन टाकली. निर्मितीमध्ये कमलेश भडकमकर, विवेक आपटे वगैरेंचा सहभाग होता, त्या सर्वांचा सत्कार यावेळी झाला. संस्कार भारतीच्या या कार्यक्रमाला संस्कार भारती नागपूर महानगर अध्यक्ष कांचन वहिनी गडकरी हजर होत्या. नागपूरकरांना एक सुखद भावपूर्ण संगीत अनुभव अनुभवता आला, याचे श्रेय कांचन वहिनी गडकरींचेच होते. पण त्याचा उल्लेख ही त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात करू नाही. एक अविस्मरणीय भेट संघ शताब्दीनिमित्त नागपूरकरांना मिळाली. ‘अजरामर संघ गीतांचे लोकार्पण’ हा कार्यक्रम रेशीमबागच्या सुरेश भट सभागृहात झाला. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने त्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे मंच संचालन ख्यातनाम अभिनेते शरद केळकर यांनी अतिशय प्रभावीपणे पसंतीच्या पावत्या क्षणाला घेत केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ संघ अधिकारी प्रचारक हजर होते. अजरामर संघ गीताचे लोकार्पण झाल्यावर पद्मश्री शंकर महादेव यांनी यातील काही गीतांचे गायन केले तर काहींची झलक नागपूरकरांना दाखविली. माजी पंतप्रधान व संघ स्वयंसेवक अटल बिहारी बाजपेयी यांची रचना-
‘निर्माण के पावन युग मे, हम चरित्र निर्माण न भुले
स्वार्थ साधना के आंधी मे, वसुधा का न भुले’
हे विकासाचे पसायदान. त्याचे गायन झाल्यानंतर नागपूरचे डॉ. श्री. भा. वर्णेकर यांचे ‘नसा सतत स्मरणीयम’ हे संस्कृत Sangha gita- sangha prarthana गीत गायले गेले. या दोन रचनांच्या सादरीकरणानंतर संपूर्ण सभागृह जणू शंकर महादेवनमय झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून ‘हम करे राष्ट्र आराधना’ या माहिती सांगितली. बनारसचे ख्यातनाम हिंदी कवी विश्वनाथ शुक्ल यांनी या गीताची रचना केली होती. ‘तुम करो राष्ट्र आराधन’ हा त्याच्या सुरुवातीचा मुखडा होता, पण गीत सुरू झाले. श्री गुरुजींनी ते ऐकले. त्यांना तो मुखडा आवडला नाही. ते म्हणाले, ‘तुम्ही करो, क्यू? हम क्या करेंगे?’ त्यांचा हा अभिप्राय कवीला कळविला व या गीताचे बोल झाले- ‘हम करे राष्ट्र आराधन.’ कवींनाही हा बदल अधिक भावला. ते म्हणायला लागले की, या बदलाने माझे गीत अधिक लोकांपर्यंत जाणारे ठरले आहे आणि माझेही जीवन बदलून टाकणारे आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तेव्हापासून हे गीत या नवीन शब्दावलीसह गायले जाऊ लागले. याच साने गुरुजींचे ‘बलसागर भारत होवो’ हे गीत सादर झाले. त्याबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले, आमची सर्वच गीते फक्त स्वयंसेवकांनी रचली आहेत असे नाही, तर बाहेरच्या लोकांनी रचलेली गीतेही आम्ही स्वीकारली आहेत. साने गुरुजी हे कधीच संघ स्वयंसेवक नव्हते; उलट ते संघ विरोधक होते. तरी त्यांचे गीत आम्ही स्वीकारले. तो एका हुंकार होता. साने गुरुजींच्या देशभक्तीबाबत कसलाही वाद नाही आणि तो होऊ शकत नाही.
याच गीताचा आणखी एक किस्सा नागपूरला झालेल्या सुधीर फडके यांच्यावरील पुस्तकाच्या विमोचनात त्यांचे ख्यातनाम गायक पुत्र श्रीधर फडके यांनी सांगितला होता. बाबूजी संघ गीते शिकवायला वर्धा येथील शाखेत गेले होते. जवळ सेवा दलाचीही शाखा लागली होती. कानावर ‘बलशाली भारत हो’ हे साने गुरुजींचे गीत ऐकायला येऊ लागले. ते म्हणाले आपल्या साने गुरुजींचे हे गीत आहे, पण यातले शब्द ते शिक्षक सांगत आहेत तितक्या स्पष्टपणे आपण म्हणत नाही. सर्वजण शाखा सुटल्यावर संघ शाखेवर आलेत आणि त्यांनी बाबूजींना नम्रपणे विचारले, हे आमच्या साने गुरुजींचे गीत आहे. तुम्ही गीत आम्हाला शिकवा आणि बाबूजींनी लगेच त्यांचा सराव सुरू करू असे सांगितले. हे गीत सेवा दलवाल्यांनाही बाबूजींनी शिकवले होते.
बाबूजी मुळातून स्वयंसेवक होते. मुंबईला संघ कार्यालय येथे राहिले होते. पण मध्यंतरी काहीतरी गडबड झाली आणि त्यांना कार्यालयातून बाहेर जावे लागले. काही दिवसांनी डॉक्टर हेडगेवार मुंबई कार्यालयात आले आणि त्यांनी चौकशी केली. तेव्हा बाबूजींचा तपास सुरू झाला. बाबूजी त्यावेळी फूटपाथवर एका दिव्याखाली राहत होते. ते पुन्हा संघ कार्यालयात राहायला आलेत. याच बाबूजींनी ज्यावेळी एका मकर संक्रमणाला डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृती मंदिराचे उद्घाटन झाले, त्यावेळी वैयक्तिक गीत म्हटले होते. संघ प्रथेप्रमाणे त्यांचे नावही घोषित करण्यात आले नव्हते. नंतर बाबूजींनी संघ रेकॉर्ड एचएमव्हीतर्फे काढले होते.
Sangha gita- sangha prarthana संघाचे वैशिष्ट्य आहे की, ते संघ गीते कोणी लिहिली आहेत हे माहीत नसते व त्याचा गायकही कधीच ज्ञात होत नाही. यासंबंधीचा एक किस्सा गमतीदार आहे- एकदा संघाचा एक उत्सव जवळ आला होता आणि वैयक्तिक गीताला शब्द गवसत नव्हते. गीत अजून ठरत नव्हते. त्यावेळेला कार्यालयाचे प्रमुख मोहरील यांनी बच्छराज व्यास यांना एका खोलीत बंद केले आणि सांगितले, संघ गीत मिळाल्याशिवाय खोलीचा दरवाजा उघडणार नाही आणि जवळजवळ तासभराने एक नवीन संघ गीत हातात आले. डॉ. मोहनजी भागवत संघ गीताच्या बाबतीत बोलताना म्हणाले, संघगीताचा कुठलाही कॉपीराईट नाही. सर्व गीतं ही संघ स्वयंसेवक यांच्या त्याग व तपस्येतूनच तयार संगीत व शब्द हे भावनेचे वाहक आहेत. उत्तम शब्द थेट हृदयाला भिडतात आणि त्याला संगीताची जोड मिळाली तर ती भावना आणि शब्द याचे ग्रहण मन:पटलावरती अति गतिमान होते. संघ स्वयंसेवकांच्या जीवन तपस्येतूनच अनेक गीतांची निर्मिती झाली आहे. सरसंघचालक ज्यावेळी नागपूरला प्रचारक होते, त्यावेळेला गीत गाणार्या स्वर्गीय अशोक कानगो आणि पांडे या दोन गीत गायकांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
शंकर महादेवन यांच्या गायनाचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, संघात गायली जातात तशीच त्यांनी ही गीते गायली आहेत. ते संघात कधी गेले की नाही माहीत नाही, पण संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात ते आले होते. त्यांनी आता राष्ट्रीय गीतेच गावीत, असे मला वाटते. पहा किती शक्य होते.
शंकर महादेवन यांनी आपल्या गीताचा एवढा प्रभाव जनमानसावर टाकला होता की, त्यांच्या सुरांना प्रेक्षक तर टाळ्यांनी साथ देत होतेच; पण समोरच्या रांगेत बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः नितीन गडकरी आणि काही वेळेला डॉ. मोहनजी भागवत यांचीही टाळ्यांची साथ मिळत होती. सरसंघचालक हे स्वतः उत्तम आणि जाणकार आहेत.
सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, भय्याजी जोशी, संघाचे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख स्वान्त रंजनजी यांनी विविध गीतांवर व्हिडीओच्या माध्यमातून टिप्पणी केली. ‘चरैवति, चरैवति यह शुभ मंत्र हमारा’ या गीताबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना दत्ताजी म्हणाले, केरळातील कालिकतला जनसंघाचे अधिवेशन १९६५ ला झाले होते. त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप ‘चरैवति’ याच शब्दांनी केला होता, याच मंत्राने केला होता. भय्याजी जोशी यांनी ‘ध्वज केसरी शिवाचा’ या गीताची महती सांगितली. सूरसंगम, तालसंगम, विश्व मे गुंजे हमारी भारती ही गीते ही शंकर महादेवन यांनी सादर केली आणि सर्व प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवून गेले.
आपल्या भाषणात महादेवन यांचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा गायकाने ही सर्व गीते गायली आहेत, ज्याच्या नावात शंकरही आहे आणि महादेवही आहे. महादेवाने आपल्या जटेत गंगेला धारण केले होते, तर हे शंकर आपल्या गळ्यात स्वर गंगेला धारण करतात. त्यावर टाळ्यांच्या कडकडाटाने पसंतीची पावती दिली गेली, दाद दिली गेली. स्वतः महादेवन यांनी उठून त्यांना अभिवादन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर स्पष्ट सांगितले की, आज आम्ही अतृप्त आहोत. खासदार महोत्सवात शंकर महादेवन यांना एक दिवस येऊन संपूर्ण २५ गीते सादर करावे लागतील आणि शरद केळकर यांना त्यावेळी सूत्रसंचालन करावे लागेल. या दोघांनाही मी आत्ताच आमंत्रण देत आहे. त्यावर म्हणाले, मला माहीत नाही, त्यावेळी मी नागपूरला असेल की नाही. नागपूरला असलो तर मी नक्कीच राहीन.
या Sangha gita- sangha prarthana गीतांमधून भारताच्या विकासाची, महिलांच्या सशक्तीकरणाची अशा खूप चित्रफिती दाखविल्या जात होत्या. त्यात नव्याने ग्रँडमास्टर झालेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखची झलक बघायला मिळाली. सोबतच एरवी न बघायला मिळालेल्या खूप खूप गमतीजमती बघायला मिळाल्या. दीप सर्वजण समईजवळ पोहोचले. नितीनजींनी दीप प्रज्वलक सरसंघचालक मोहनजींना दिला. त्यांनी दीप प्रज्वलन करून पुन्हा तो नितीनजींना दिला. त्यांनी प्रज्वलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा प्रयत्न केला, पण देवेंद्रजी त्यांना सांगत होते. ‘आधी तुम्ही दीप प्रज्वलन करा.’ दीप प्रज्वलक एकाक्षणी जवळजवळ व्यवस्थित देवेंद्रजींच्या हातात आला. पण त्यांनी अखेर नितीनजींना दीप करायला लावले.
स्वागत समारंभातही हेच झाले. देवेंद्रजींचे स्वागत झाल्यावर नितीनजींचे स्वागत होणार होते. नितीनजींनी स्वतः स्वागत स्वीकारण्याऐवजी ते साहित्य घेऊन पद्मश्री शंकर महादेवन यांचा सत्कार केला. शंकर महादेवन यांच्या सत्कार प्रत्यक्षात नंतर मोहनजींच्या हस्ते होणार होता. त्यानंतर झालाही, पण शंकर महादेवन यांना नितीनजींच्या हस्तेही स्वागत स्वीकारावे लागले. पुन्हा अचानक पुढे आले आणि त्यांनी मंच संचालन करणार्या शरद केळकर यांचाही सत्कार मोहनजींच्या हस्ते घडवून आणला. शरद केळकर तर या सत्काराने एवढे भारावून गेले होते की, ते चक्क मराठीत सांगते झाले... ‘मी धन्य झालो आहे. हा क्षण कायम माझ्या स्मरणात राहील.’ याचवेळी वाद्यावर शंकरजींना साथ करणार्या स्वमिल सिंगारपुरे यांचाही सत्कार आला.
सामान्यतः कार्यक्रमात असे होते की, सरसंघचालक बोलायला जायला लागलेत की, आजूबाजूचे सर्वजण उभे राहतात. त्यात नेमके सरसंघचालक आपल्या जागेवरून ध्वनिक्षेपकापाशी जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला होते आणि तेही उभे राहायला लागले. त्यामुळे ‘उभे राहू नका, बसा’ असे सांगत व हाताने खूण करीत मोहनजी सरळ ध्वनिक्षेपकाजवळ जाऊन लागले.
Sangha gita- sangha prarthana या लोकार्पण सोहळ्यात गीतांचा जो अल्बम आणला होता. तो इतक्या घट्ट पद्धतीने बांधण्यात आला होता की, त्याच्यावरचे कव्हर काढण्यासाठी जवळजवळ सर्वांनाच झटापट करावी लागत होती. मोहनजींच्या अल्बमवरचे कव्हर शेवटी नितीन गडकरी यांना बाजूला करावे लागले, त्यासाठी मदत करावी लागली. अशी झटापट टाळता आली असती तर उत्तम. एक नक्की गडकरी पती-पत्नी नितीनजी आणि कांचन वहिनी यांनी नागपूरला दोन सुरेल मैफिली दिल्यात. संघ गीते आणि संघ प्रार्थना याचा सुखद नवाविष्कार कसा असतो, याचा अनुभव दिला. हा अनुभव नागपूरकर दीर्घकाळ विसरणार नाहीत.