कारंजा लाड,
Dr Alok Ghodke PhD शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं हे डॉ. आलोक कडुबा घोडके (शास्त्री) यांनी आपल्या कृतीतून सत्य ठरवलं. सेवानिवृत्त संस्कृत शिक्षक असलेल्या या विद्वानांनी आयुष्याच्या उत्तरार्धातही ज्ञानसाधना थांबवली नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि संस्कृतप्रेम यांच्या बळावर त्यांनी ‘आचार्य पूज्यपाद एवं सर्वार्थसिद्धी’ या प्राचीन आणि महत्त्वपूर्ण ग्रंथावर समीक्षात्मक संशोधन सादर करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.ही पदवी त्यांना एकलव्य विद्यापीठ, दमोह (म.प्र.) येथे ९ ऑटोबर २०२५ रोजी आयोजित समारंभात प्रदान करण्यात आली.
डॉ. आलोक घोडके यांच्या संशोधनातून भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि तर्कशास्त्राच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे. त्यांनी आचार्य पूज्यपाद यांच्या चिंतनशैलीचे सखोल विश्लेषण करून त्यांच्या विचारांची आधुनिक सुसंगती आणि भाष्यपरंपरेतील वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे स्पष्टीकरण केले आहे.हे संशोधन कार्य संस्कृत विभागाचे प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष कुमार जैन शिक्षाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुधा मलैया, पूजा मलैया आणि प्र. कुलगुरू रती मलैया यांचेही मार्गदर्शन लाभले. तोंडी परीक्षेचे अध्यक्षत्व प्रा. पवन कुमार जैन (कुलगुरू, एकलव्य विद्यापीठ) यांनी केले. मध्य प्रदेशातील प्राध्यापक संगीता मेहता यांनी पीएचडी व्हाइव्हा चे संचालन केले. याप्रसंगी विद्यापीठातील कला व मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. आर. सी. जैन, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता प्रा. जे. पी. शमा खानम, मूलभूत व उपयोजित विज्ञान विभागाच्या डॉ. निधी असाटी, विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. शैलेंद्र जैन, अभियांत्रिकी विभागाचे डॉ. अनिल पिंपळापुरे, तसेच डॉ. अभिषेक जैन, डॉ. एस. एन. गौतम, डॉ. उषा खंडेलवाल, डॉ. एस.के. तिवारी, डॉ. विजय साहू, डॉ. प्रमिला कुशवाह, डॉ. दीपक रजक, डॉ. वंदना पांडे, डॉ. दुर्गा महोबिया, डॉ. मनीषा दिक्षीत, डॉ. विजया लक्ष्मी, डॉ. वंदना शुला, ईशा सचदेव, प्रभात, गोविंद, आकाश, सतेंद्र आणि महेश उपस्थित होते.
डॉ. आलोक घोडके यांनी शिक्षण, अध्यापन आणि लेखन या क्षेत्रांत अनेक वर्षे अविरत योगदान दिले आहे. त्यांच्या चिकाटीने शिक्षण म्हणजे केवळ तरुणपणातील जबाबदारी नव्हे, तर आयुष्यभर चालणारी साधना आहे. हे दाखवून दिले.त्यांच्या या यशाबद्दल कारंजा शहरासह संपूर्ण विदर्भात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.