अनिल अंबानी ग्रुपचे सीएफओ अशोक पालला अटक

11 Oct 2025 11:22:58
नवी दिल्ली,
Anil Ambani Group CFO arrested अनिल अंबानी यांच्या एडीए समूहातील मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात, रिलायन्स पॉवरचे मुख्य वित्तीय अधिकारी अशोक कुमार पाल यांना मनी लाँड्रिंगच्या संशयाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी रात्री अटक केली. पाल यांना पीएमएलए (मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दिल्ली येथील ईडी कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना लवकरच दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
 
 
 
Anil Ambani Group CFO arrested
 
तपासणाऱ्यांच्या माहितीनुसार, सौर ऊर्जा महामंडळास (एसईसीआय) सादर केलेल्या ६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बनावट बँक हमीच्या व्यवहारात पाल यांनी "महत्त्वाची भूमिका" बजावली. ही हमी बनावट बिलिंग, शेल कंपन्या आणि बनावट ईमेल डोमेन वापरून तयार करण्यात आली होती. Anil Ambani Group CFO arrested या सर्वांचा उद्देश फसव्या आर्थिक साधनांना कायदेशीर स्वरूप देणे हा होता. ईडीच्या माहिती नुसार, पाल यांनी बनावट हमी जारी करण्यासाठी बिस्वाल ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड या फर्मची नियुक्ती करण्यास मदत केली होती. ही योजना एका सूचीबद्ध कंपनीकडून सार्वजनिक निधी वळवण्याचा भाग होती, ज्यामध्ये ७५% पेक्षा जास्त शेअर्स जनतेकडे आहेत. अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत पाल यांची अटक ही एक महत्त्वाची प्रगती मानली जात आहे. ऑगस्ट महिन्यात, ईडीने मुंबईतील ३५ ठिकाणी छापे टाकले होते, ज्यामध्ये ५० कंपन्या आणि २५ व्यक्तींचा समावेश होता. त्याच महिन्यात अनिल अंबानींना ही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
 
 
तपासाचा केंद्रबिंदू येस बँकेकडून एडीए समूहातील कंपन्यांना मोठ्या कर्जांचा गैरवापर करण्याचे होते. तत्कालीन सीईओ राणा कपूर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या कर्जांचा वापर आता फसवणुकीसाठी करण्यात आला आहे, असा आरोप तपासकर्त्यांकडून करण्यात आला आहे. सध्याच्या चौकशीसोबतच, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने राणा कपूर आणि अंबानी यांच्याशी संबंधित दोन भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यात आर्थिकदृष्ट्या अस्थिर कंपन्यांना सार्वजनिक निधी हस्तांतरित करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. अशोक पाल हे चार्टर्ड अकाउंटंट असून, २५ वर्षांचा अनुभव आहे. ते सात वर्षांहून अधिक काळ रिलायन्स पॉवरमध्ये कार्यरत आहेत आणि २९ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
Powered By Sangraha 9.0