तभा वृत्तसेवा
आर्णी,
Arni Vitthal Temple donation यावर्षी अतिवृष्टीनेे शेतकèयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्णी येथील विठ्ठल मंदिर संस्थानने शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांना मुख्यमंत्री मदत निधीसाठी 51 हजार रुपये मदतीचा धनादेश दिला.आर्णी येथील विठ्ठल मंदिर संस्थानने आपली सामाजिक दायित्वाची जाण व ही जबाबदारी समजून संस्थानचे अध्यक्ष, सचिव आणि विश्वस्त मंडळाने चर्चा करून, आपणही यात खारीचा वाटा उचलावा, असा निर्णय घेतला.
त्यानुसार मुख्यमंत्री मदत निधीमध्ये संस्थानचे सचिव विनायक थोडगे, संचालक अनिल पोदुतवार, निलेश चिंतावार, राजेश माहेश्वरी, विनोद सोयाम आणि इतरांनी मुख्यमंत्री निधीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांना 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.