दारव्हा काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

11 Oct 2025 14:25:53
तभा वृत्तसेवा दारव्हा,
Darwha Congress protest दारव्हा तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. यामध्ये दारव्हा तालुका ओला दुष्काळग्रस्त तत्काळ जाहीर करावा, शेतकèयाची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
 

Darwha Congress protest 
तसेच अतिवृष्टीमुळे शेतांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकèयाच्या नदी-नाल्या काठावरील शेती खरडून गेलेल्या शेतकèयांना हेक्टरी 1 ते 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, दारव्हा तालुक्यातील शेतकèयांच्या पिकाची लावलेली आणेवारी 55 पैशांऐवजी 50 पैशांच्या आत करण्यात यावी, याही मागण्या त्यांनी केल्या आहेत.तसेच शेतकèयांना मागील पीकविम्याची थकबाकी तत्काळ देऊन यावर्षीचा पीकविमा सरसकट देण्यात यावा, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेचे थकित मानधन लाभार्थ्यांना तत्काळ देण्यात यावे, पंतप्रधान सन्माननिधीची थकीत रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला व काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने या मोर्चात सहभागी होते. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. वसंत पुरके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रफुल मानकर व उपाध्यक्ष राहुल ठाकरे यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0