अनिल कांबळे
नागपूर,
Exchanging pistols : तुरुंगात शिक्षा भाेगत असताना दाेन आराेपी चांगले मित्र झाले. मागे-पुढे ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात हाेते. अशातच गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेल्या या दाेघांनी आपसात पिस्तूल आणि काडतुसांची देवाण-घेवाण केली. यातील एकाला पाेलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दुसऱ्याचे नाव सांगितले. यानंतर दाेघांनाही दाेन पिस्तूल आणि पाच जीवंत काडतुसासह अटक करण्यात आली.
वाडी पाेलिसांचे तपास पथक गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ईस्माईल ले-आऊट, वडधामना, अमरावती राेड येथील एका बंद पडक्या घराच्या आवारात पाेहचले. एक गुंड हा पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती त्यांना हाेती. त्यानुसार पाेलिसांनी सापळा रचला. अल्केश गजभिये तिथे आला असता पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल, मॅग्झीन व 5 जिवंत काडतूस सापडले. हे पिस्तूल पाेलिसांनी जप्त केले.
चाैकशीत त्याने हाैसेकरिता त्याच्या मित्र समीर शेख उफर् येडा (यशाेधरानगर) याच्याकडून 2 पिस्तूल 5 काडतसूस खरेदी केल्याचे सांगितले. दुसèया पिस्तूलाबाबत चाैकशीत आराेपीने ते त्याला तुरुंगात भेटलेला मित्र पीयूष माराेतराव मलवंडे (29, प्लाॅट नंबर 34, जुनी शुक्रवारी, लभान तांडा, काेतवाली) याला दिल्याची माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी पीयूषला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान, पाेलिसांनी अल्केश आणि पीयूष या दाेघांच्या ताब्यातून दाेन पिस्तूल पाच काडतूस जप्त करीत त्यांना अटक केली.या दाेन्ही पिस्तूल येडा शेख याच्याकडून विकत घेतल्या असून त्याचा काही दिवसांपूर्वीच यशाेधरानगर खून झाल्याची चर्चा आहे.