घाटंजी नपचे प्रभागनिहाय आरक्षण; महिलांना समान संधी

11 Oct 2025 20:15:33
तभा वृत्तसेवा
घाटंजी,
Ghatanji News : घाटंजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. काही इच्छुकांच्या अपेक्षांनुसार प्रवर्ग ठरल्याने आनंदाचे वातावरण दिसले, तर काहींना आता दुसèया प्रभागात भाग्य आजमावे लागणार आहे.
 
 
 
ele
 
 
 
नवीन आरक्षणानुसार महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे. दहा प्रभागात महिलांसाठी दहा राखीव जागा आहेत. एकूण 20 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी दोन (एक महिला), अनुसूचित जमातीसाठी दोन (एक महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी पाच (तीन महिला), तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी अकरा जागा आहेत. त्यापैकी पाच महिलांसाठी राखीव आहेत.
 
 
प्रभागनिहाय आरक्षण असे आहे. प्रभाग एक : अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण. प्रभाग दोन : महिला व सर्वसाधारण. प्रभाग तीन : अनुसूचित जाती व महिला. प्रभाग चार : अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण.
 
 
प्रभाग पाच : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला. प्रभाग सहा : नामाप्र महिला व सर्वसाधारण. प्रभाग सात व आठ : नामाप्र महिला व सर्वसाधारण. प्रभाग नऊ : अनुसूचित जमाती व महिला. प्रभाग दहा : नामाप्र व महिला.
 
 
या आरक्षणामुळे सर्व समाजघटकांना समान प्रतिनिधीत्व मिळाले आहे. महिलांचे प्रतिनिधीत्व लक्षणीय असल्याने यंदाची निवडणूक महिला उमेदवारांसाठी विशेष ठरणार आहे. आरक्षणाशिवाय इतर सर्वच ठिकाणीसुद्धा लढण्याची महिलांना मोकळीक आहेच.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला विविध पक्षांनी सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून राळेगाव उपविभागीय अधिकारी सचिन पाटील होते. नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राजू घोडके उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0