अट्टल चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

11 Oct 2025 19:37:49
वर्धा,
Wardha house burglary स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अट्टल घरफोडी करणार्‍यास अटक केली. त्याने चार घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्याच्याकडून १ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 

Wardha house burglary 
येथील स्नेहलनगर परिसरात सतत होत असलेल्या चोरी व घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी याबाबतचे निवेदन पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांना दिले. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे दाखल गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी दोन पथक तयार करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने समांतर तपासाला गती देत विविध भागातील सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासून आणि गुप्त पद्धतीने माहिती घेत आरोपी निष्पन्न केला. याच आरोपीने काही वर्षाआधी वर्धा, नागपूर, भंडारा व इतर जिल्ह्यात घरफोडी केल्याचेही पुढे आले. १० ऑटोबरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरातून ओमप्रकाश खांडवे (३५) रा. तुलसीनगर, बुलढाणा यास ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्याने वर्धेत घरफोड्या व मोटरसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी २ लॅपटॉप, ७ मोबाइल व १ दुचाकी असा १ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, दिनेश बोथकर, विकास मुंढे, सुगम चोधरी, शुभम राऊत, अरविंद इंगोले, सुमेध शेंद्रे, राहुल अथवाल, जगदीश डफ, आशिष उमरकर यांनी केली.
Powered By Sangraha 9.0