विमेन्स कॉलेजमध्ये आरोग्य समुपदेशन कार्यक्रम

11 Oct 2025 21:58:44
नागपूर,
Womens College विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नंदनवन येथे राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विषयक समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुभेदार यांनी गर्भाशयाचा कर्करोग आणि इतर कर्करोगांचे कारणे, लक्षणे व प्रतिबंधक उपाय विद्यार्थिनींना सविस्तर समजावले. रक्त तपासणी अहवालानुसार हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या विद्यार्थिनींची तपासणी करून औषधे सुचविली.
 
Womens College
 
आहार तज्ञ डॉक्टर मराठे यांनी संतुलित आहारात लोह, जीवनसत्व व प्रथिनांचे महत्त्व स्पष्ट केले आणि शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय सिंगनजुडे यांनी केले, तर अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गुल्हाने यांनी भूषविले. प्रमुख पाहुणी वैदर्भीय महिला संस्थेच्या अध्यक्षा सावित्रीताई रोकडे उपस्थित होत्या. Womens College कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ. अनिता तलमले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अलका ब्राह्मणकर यांनी केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. विजया राऊत, प्राध्यापक दाते व प्रा. विशाल सोरते देखील उपस्थित होते. विद्यार्थिनींनी या आरोग्य विषयक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
सौजन्य: अमित तीतारे, संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0