हिंदी वाचनालय संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा

11 Oct 2025 19:23:05
तभा वृत्तसेवा
पुसद,
Mohini Naik opinion हिंदी वाचनालयामध्ये उपलब्ध पुस्तके हे केवळ साहित्य नसून आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी गाव, धर्माचा आदर करीत आणि वाचन संस्कृतीचा सन्मान करीत आई सरस्वतीच्या आशीर्वादाच्या स्वरूपाने हे सारस्वताचे दालन आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे हे केवळ वाचनालय नसून पूर्वजांचे आशीर्वाद असल्याचे मत नाईक फाऊंडेशनच्या अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी व्यक्त केले.
 

Hindi library culture, Mohini Naik opinion, Pusad Hindi library, Hindi library heritage, Hindi literature preservation, Naik Foundation support, literary donations Hindi library, Hindi reading culture Maharashtra, Hindi library history, Sudhakarrao Naik contribution, Sharad Pawar funding Hindi library, Hindi literary events Pusad, Hindi books donation, cultural heritage Maharashtra, Hindi library leadership, Hindi literary promotion Maharashtra, Indian reading culture preservation, Pusad cultural institutio 
पुसद शहरातील 88 वर्षे जुन्या शासनमान्य हिंदी वाचनालयाला नाईक फाऊंडेशनच्या अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी हिंदी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय सोनी यांच्या हस्ते ‘न संपणारे शब्द’ हा ग्रंथ, वाचनालयाचे माजी सचिव व साहित्यिक कै. गिरधारीलाल अग्रवाल यांनी लिहिलेले ‘हमारी लाडली पुसद नगरी’ व ‘हिंदू देवता और विज्ञान’ हे ग्रंथ भेट देऊन नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदी वाचनालयाला यापूर्वी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, माजी मंत्री मनोहर नाईक यांनीही सदिच्छा भेटी दिल्या आहेत. सुधाकरराव नाईक यांनी 1994 साली वाचनालयाच्या नवीन बांधकामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे विशेष शिफारस करून मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपये मिळवून दिले होते.
आपल्या भेटीदरम्यान त्यांनी वाचनालयाची मोठ्या आत्मीयतेने माहिती घेतली. हिंदी वाचनालयाच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी निश्चित सहकार्य करू असे आश्वासन मोहिनी नाईक यांनी दिले. याप्रसंगी हिंदी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय सोनी, सचिव अखिलेश अग्रवाल संचालक मनोज बजाज व विजय कडू यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0