हिंगणघाटात १ किलो ४० ग्रॅम गांजा जप्त

11 Oct 2025 19:46:12
वर्धा,
Hinganghat स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने हिंगणघाट येथील महात्मा फुले वार्डातील गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगाराच्या घरी छापा टाकूण १ किलो ४० ग्रॅम गांजा जप्त करून दोघांना अटक केली. पोलिसांनी गांजा, दुचाकी, दोन मोबाईल असा १ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 

Hinganghat 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार १० रोजी गस्तीवर असताना गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार संदीप उर्फ आऊ जनबंधू रा. महात्मा फुले वार्ड याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी संदीप आणि त्याचा सहकारी जय भोपळे रा. खंडोबा वार्ड हे दोघे मिळून आले. घराची झडती घेतली असता प्लास्टीक पिशवीमध्ये गांजा मिळून आला. हा गांजा त्यांनी दुचाकीने टेकानाका नागपूर येथुन राजू नामक इसमाकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून १ किलो ४० ग्रॅम गांजा, मोटर सायकल, दोन मोबाईल, असा १ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, विजयसिंग गोमलाडू, पोलिस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0