फलोत्पादन विकासासाठी विविध घटकांकरिता अनुदान

11 Oct 2025 14:49:29
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
integrated horticulture development scheme महाराष्ट्र हे राज्य विविध फळे व इतर फलोत्पादन पिकांच्या उत्पादन व निर्यातीमध्ये आघाडीवर असून, राज्य शासनाने फलोत्पादन क्षेत्राचा विस्तार साधण्यासाठी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात शेतकèयांना विविध घटकांकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
 
 

integrated horticulture development scheme 
या अभियानांतर्गत घटकांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. फळपिक लागवडी मध्ये ड्रॅगनफ्रुट (2.70 लाख प्रती हेक्टर), स्ट्रॉबेरी (0.80 लाख), फुलपीक लागवडी अंतर्गत दांड्याची फुले (0.5 लाख), कंदवर्गीय फुले (1.0 लाख), सुटी फुले (0.2 लाख). मसाला पिके लागवड अंतर्गत मिरची (0.20 लाख), आले, हळद (0.4 लाख), औषधी व सुगंधी वनस्पती लागवडी करिता (0.6 लाख), संत्रा फळबाग पुनार्जीव्वन (0.24 लाख). सामुहिक शेततळे, तसेच वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, अळीबी उत्पादन मापदंडाच्या 75 टक्के अनुदान, हरितगृह व शेडनेट गृह, प्लास्टिक मल्चिंग, पॅकहाउस व कांदाचाळ या घटका करिता खर्च मापदंडाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
तसेच संकलन एकत्रीकरण केंद्र, पूर्व- शितकरण गृह, फिरते पूर्व-शितकरण गृह, शितखोली, सौरऊर्जा शितखोली, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, एकात्मिक शितसाखळी प्रकल्प करिता खर्च मापदंडाच्या 35 टक्के अनुदान देण्यात येते.या सर्व घटकांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकèयांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकèयांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0