नागपूर,
Narendranagar भारतीय जनता पार्टी, नरेंद्रनगर मंडळातर्फे प्रभाग क्रमांक ३५ (क) मधील वीर हनुमान मंदिर उज्ज्वल सोसायटी येथे कोजागिरीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्रनगर मंडळाने केले होते. कार्यक्रमात उपस्थितांना जेवणासोबत दुधाची मेजवानी आणि सुमुधर संगीताचा आनंदही देण्यात आला. श्रोत्यांनी जेवणाचा आस्वाद घेताना मनमोहक संगीताचा आनंद घेतला. या कार्यक्रमात प्रभागातील काही कार्यकर्त्यांनी गाणी सादर केली.
कार्यक्रमात सर्वश्री महेंद्र भुगावकर, अध्यक्ष नरेंद्रनगर मंडळ, भूषण केसकर, रमेश भंडारी, संजय खोरगडे, संजय सिन्हा, अंजली देशपांडे, प्रशांत दशपुत्रे (अध्यक्ष प्रभाग ३५ (क)) यांच्यासह सर्व बूथ प्रमुख सुनील मलवे, आनंद खापरे, स्वाती लांजेवार, पांढरीपांडे, रत्नाकर उत्तरवार, जगदीश कावळे, मनीष देहाडराय, बिट्टूजी चौहान, ऍडव्होकेट प्रफुल्ल मोहगावकर, संजय पवनीकर उपस्थित होते.
सौजन्य: स्मिता बोकारे, संपर्क मित्र