दिवाळीत बनवा खुशखुशीत लवंग लतिका

11 Oct 2025 14:38:46
lavang latika recipe दिवाळी काही दिवसावर आली असतांना नेहमीचेच पारंपरिक पदार्थ तयार करण्या ऐवजी यंदा काही खास बनवा, आज आपण जाणून घेऊया एक खास बंगाली मिठाई ‘लवंग लतिका’! ‘लवंग लतिका’ हा दिसायला सुंदर आणि खायला अतिशय स्वादिष्ट असा पारंपरिक बंगाली गोड पदार्थ आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून खवा, साखर आणि सुगंधी वेलचीच्या सारणाने भरलेला हा पदार्थ पाहताच तोंडाला पाणी सुटतं.
 
लवंग लतिका  
 
 
‘लवंग लतिका’ बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, रवा, साखर आणि थोडं तूप घालून मऊसर पीठ मळून घ्यावं. त्यानंतर कढईत रवा आणि खवा छान भाजून घ्यावा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलचीपूड आणि ड्रायफ्रुट पावडर घालून सारण तयार करावं. दरम्यान साखर आणि पाणी एकत्र करून पाक तयार करून त्यात केसराचा सुगंध मिसळावा.
आता पीठाच्या छोट्या पुड्या लाटून त्यात एक चमचा सारण भरावं, नीट वळकुटी करून बंद करावं आणि त्यावर एक लवंग खोचावी. अशा प्रकारे सर्व लतिका तयार झाल्यावर त्या मंद आचेवर तुपात तळून घ्याव्यात.lavang latika recipe सोनेरी रंग येईपर्यंत तळलेल्या लवंग लतिकांना दोन ते तीन मिनिटे पाकात बुडवून ठेवावं. थंड झाल्यावर या ‘लवंग लतिका’ खायला तयार होतात.
Powered By Sangraha 9.0