मानोरा,
Manora police raid मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या मौजे पोहरादेवी येथे ९ ऑटोबर रोजी पोलिसांनी बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ३० हजार ३२५ रुपयाचा रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त करून फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक अभिजीत बारे यांच्या फिर्यादीवरून ३ आरोपीविरुद्ध पोलिसांनी कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार पोहरादेवी येथे एका बंदीत घरामध्ये पोलिसांनी जुगार रेड केली असता नगदी १२०० रुपये, वरली, मटका आकड्यांचे नोटबुक, डॉट पेन किंमत २५ रुपये, जुने वापरते तीन कॅल्युलेटर किंमत ३०० रुपये, चार मोबाईल किंमत २८ हजार रुपये असा एकूण ३० हजार ३२५ रुपयाचा जुगार माल मिळून आल्याने आरोपी शेख फिरोज शेख कादर ( वय २८ ) रा. पोहरादेवी, विनोद इंद्रकुमार बोराकर वय (वय ३८ ) रा. दत्तापूर दिग्रस व किशोर जयस्वाल ( वय ४३) रा. पोहरादेवी या तिघांविरुद्ध पोलिसांनी जुगार अॅट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक नैना पोहेकर, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत बारे, जमादार दिलीप चव्हाण, राहुल जयसिंगकार यांनी केली.