सिम्बॉयसिसमध्ये मराठी भाषा सप्ताह रंगला

11 Oct 2025 19:03:39
नागपूर,
Symbiosis सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक समृद्धतेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेला उजाळा दिला गेला. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एकत्र येऊन भाषेच्या सौंदर्याचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा अनुभव घेतला.
 
Symbiosisv
 
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सुमित सिंह यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेवर प्रकाश टाकत तिच्या साहित्यिक, सामाजिक आणि बौद्धिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. Symbiosis त्यांनी विद्यार्थ्यांना भाषेच्या अभ्यासातून आत्मसात होणाऱ्या मूल्यांची जाणीव करून दिली. यावेळी डायरेक्टर डॉ. समीर पिंगळे यांनी सांगितले की, मराठी भाषा सप्ताह हे केवळ सांस्कृतिक उत्सव नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. भाषेच्या माध्यमातून संवाद, समज आणि सहिष्णुतेचा संदेश दिला गेला.
 
मराठी भाषा प्राध्यापिका सायली लाखे पिदळी यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना अभिजात मराठी साहित्याचे भावनिक आणि तात्विक पैलू उलगडून दाखवले. Symbiosis त्यांच्या समारोपीय भाषणाने उपस्थितांमध्ये भाषेप्रती नवचैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहित देशमुख यांनी केले. कार्यक्रमात कविता वाचन, अभिवाचन, भाषण स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सौजन्य: सायली लाखे पिदळी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0