पीएमश्री उच्च प्राथमिक शाळा नांदगाव येथे डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण

11 Oct 2025 19:50:20
हिंगणघाट,
Samir Kunawar जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत पी. एम. श्री. उच्च प्राथमिक शाळा नांदगाव (बो.) येथे डिजिटल साहित्य लोकार्पण आज ११ रोजी आ. समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम शैक्षणिक क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीकडे वाटचाल याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.आधुनिक काळातील शिक्षण प्रक्रियेत डिजिटल साधनांचा वापर हा केवळ एक पर्याय नसून गरज बनला आहे.
 

Samir Kunawar 
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सखोल आणि सुलभ पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. पि.एम. श्री. योजनेतील शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक कॅम्पस तसेच डिजिटल लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. साहित्य शाळेत उपलब्ध झाल्याने स्मार्ट टीव्ही, प्रोजेटर, ई-लायब्ररी, डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून यापुढे शिक्षण दिले जाणार असल्याने ही शाळा डिजिटली अद्यावत अशी ठरेल.
अध्यक्षस्थानी आ. समीर कुणावार होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे, गटशिक्षण अधिकारी अरविंद राठोड, ग्रापं प्रशासक दीपक चौधरी, शाळा समिती अध्यक्ष पूनम क्षीरसागर, शाळा समिती उपाध्यक्ष सोनू मडावी, मुख्याध्यापक सीमा बेले, ज्येष्ठ नागरिक रामदास गेडेकार, माजी पंचायत समिती सदस्य वैशाली पुरके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पत्रकार राजेंद्र राठी , तेजस तडस, संजय तडस, प्रवीण कुडे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कारमोरे, ग्रामसेवक कांबळे, अशोक देवाडे, केंद्रप्रमुख सुपपाम, विस्तार अधिकारी उमेश शिंगोटे, राजू बोभाटे, प्रकाश रोकडे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0