तभा वृत्तसेवा पुसद,
Vikas Meena पीकनुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी संबंधित खातेदारांच्या याद्या दोन दिवसांत अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पुसद येथे दिले. पुसद येथील श्री शिवाजी विद्यालय येथे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अनुदान मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाèयांच्या अध्यक्षतेत सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकाèयांनी Vikas Meena यावेळी पीक नुकसान भरपाईचे अनुदान वाटपाच्या वैयक्तिक व सामूहिक खातेदारांच्या बँक खाते क्रमांकासह याद्या पोर्टलवर अपलोड करण्याबाबत गावनिहाय आढावा घेतला. त्यात त्यांनी 50 टक्क्यांहून कमी काम असलेल्या गावांच्या याद्या तत्काळ अपलोड करण्याचे निर्देश दिले.गावनिहाय वैयक्तिक व सामूहिक खातेदारांच्या बँक खाते क्रमांक व संमतीपत्रासह याद्या तयार करून कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांत यादी अपलोड करण्याचे निर्देश दिले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी शेतकèयांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल व पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेव जोरवर, गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड, तालुका कृषी अधिकारी मुकाडे, तसेच पुसद तालुक्यातील मंडळ अधिकारी महसूल, मंडळ कृषी अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते