मृतक कर्मचार्‍याच्या वारसाला ४५ लाखाचा धनादेश

11 Oct 2025 18:18:22
मंगरुळनाथ,
Ravi Baliram Pawar accident तालुयातील भगवंतराव महाकाळ विद्यालय, मानोली येथील कर्मचारी रवि बळीराम पवार यांचा ३ जानेवारी २०२५ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे वारसांस अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वतीने त्यांच्या पत्नीस ४५ लाख रुपयाचा धनादेश बँकेचे संचालक सुभाष ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.
 

Ravi Baliram Pawar accident 
रवि बळीराम पवार यांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत होत असल्याने बँकेच्या वतीने अपघात विमा पकाढण्यात आला होता. त्यानुसार पवार यांच्या मृत्युची माहिती मिळताच अकोला - वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अकोला शाखा मंगरुळनाथ शहरचे शाखाधिकारी यांनी पगारदार अपघात विमा मिळण्यासाठी पाठपुरावा केला व त्या बँकेच्या वतीने पगारदार अपघात विमा रकम ४५ लाख मंजूर करण्यात आली. विमा रकमेचा धनादेश अपघातातील मृतकाची पत्नी माधुरी रवि पवार यांना देण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्या उपस्थितीत बँकेचे जेष्ठ संचालक तथा माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संतोष महाकाळ, मुख्याध्यापक पुनम अढाव प्रल्हाद शिंदे, विजय शेळके, तसेच विद्यालयाचे शिक्षक महादेव घुगे, अभिजीत नानोटे, बलदेव राठोड, विशाल काटेकर, भारत धनमोल, शहर शाखा शाखाधिकारी निकेता खडसे, स्वप्निल देशमुख, बालाजी राठोड, मनोज नाकाडे व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0