समुद्रपूर,
Samudrapur house fire, शहरातील वार्ड ११ मधील एका घरी आग लागली. या आगीत जीवनावश्यक साहित्य जळून मोठे नुकसान झाले. आगीची घटना लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, १० रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शहरातील वार्ड ११ मधील बेबी किन्नाके यांनी घरातील देवघरात देवाजवळ दिवा लावला. त्यानंतर त्या बाहेर गेल्या असता काही वेळातच त्यांच्या घराला आग लागली. घराशेजारी राहणार्या चौधरी व परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घरातील अन्नधान्य, कपडे, गादी, कपाट, कागदपत्र असे सर्वच जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गजानन निकोरे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.