कुटुंब व्यवस्थेचा समाजावर परिणाम : लोंढेकर

11 Oct 2025 20:06:28
शेकापूर (बाई),
shekapur-rss : कुटुंबामध्ये एकत्र बसून संवाद होत नाही. त्यामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस येते आहे. त्याचा परिणाम आपल्या समाजावर होवून आपला र्‍हास होत चालला आहे. आपण आपले स्वत्व विसरत चाललो आहे. म्हणून आपले संघटन होणे आवश्यक आहे. स्व जागृत होणे आवश्यक आहे. तरच आपण आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करू शकतो. आपल्या पुढील पिढीला सशत करू शकू, असे मार्गदर्शन वर्धा जिल्हा सह कार्यवाह प्रमुख वक्ते त्रिशूल लोंढेकर यांनी केले.
 
 
RSS
 
 
 
शेकापूर बाई मंडल स्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात शुक्रवार १० रोजी रा. स्व. संघाचे वर्धा जिल्हा सहकार्यवाह त्रिशूल लोंढेकर यांनी केले. तर वडनेर खंड संघचालक प्रशांत हिवरकर, प्रमुख पाहुणे म्हणून शेकापूर बाई येथील आपले सरकार सेवा केंद्रचे संचालक संदीप मेघरे उपस्थित होते. तत्पूर्वी गावातील मुख्य मार्गावरून घोषासह पथ संचलन काढण्यात आले. या उत्सवाला शेकापूर बाई मंडलातील स्वयंसेवक व गावातील नागरिक उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक सुनील चौधरी यांनी केले.
Powered By Sangraha 9.0