रोड डिव्हायडरवरील वाढलेल्या फांद्या अपघाताला आमंत्रण

11 Oct 2025 12:53:58
नागपूर ,
Smart City Nagpur स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नागपूर शहरात सिमेंट रस्ते व विविध सोयी-सुविधांचा विकास होत आहे. शहराचे सौंदर्य आणि पर्यावरण राखण्यासाठी रस्त्यांच्या मधोमध आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे सौंदर्यवृद्धी झाली असली, तरी काही मार्गांवरील रोड डिव्हायडरमध्ये झाडे अनियंत्रित रीत्या वाढल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

234 
 
काही ठिकाणी या झाडांच्या फांद्या रस्त्यापर्यंत खाली झुकल्या असून, विशेषतः गर्दीच्या वेळी आणि सिग्नलवर दुचाकी वाहनधारकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो.Smart City Nagpur तसेच या डिव्हायडरमध्ये वाढलेले गवत आणि झुडपे यामुळे जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढलेली आहे.नरेंद्र नगर ते मानेवाडा रोड, शताब्दी चौक ते तुकडोजी पुतळा तसेच वर्धा रोडवरील काही ठिकाणी हे चित्र स्पष्ट दिसून येते. प्रशासनाने वेळेत लक्ष देऊन या वाढलेल्या फांद्या आणि झुडपांची छाटणी केल्यास, वाहनधारकांना सुलभ वाहतूक मिळेल व अपघातांपासून बचाव होईल.
सौजन्य : संजय श्रौती,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0