आत्महत्यांनी थरारली घाटंजी!

11 Oct 2025 21:02:40
यवतमाळ,
 suicide-case-ghatanji : 
प्रेमी युगुलाची आत्महत्या
 
घाटंजी : शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावरील जुनोनी शेतशिवारात एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी शेतकरी आपल्या शेतातील विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीत दोन प्रेते तरंगताना दिसली. त्यांनी तत्काळ गावकèयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. हे प्रेमी युगुल 5 ऑक्टोबरपासून घरून बेपत्ता होते. याबाबत मुलीच्या वडिलांनी 7 ऑक्टोबरला घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
 
--------------------
 

suicide 
 
 
 
 
 
गळफास लावून तरुणाची आत्महत्या
 
 
घाटंजी : येथील प्राध्यापक कॉलनीतील रहिवासी तरुणाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 10 ऑक्टोबरला संध्याकाळी समोर आली. प्राप्त माहितीवरून, मृतक निखिल गिरी आपल्या परिवारासह प्राध्यापक कॉलनीत वास्तव्यास होता. त्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचे नेमके कारण कळाले नाही.
Powered By Sangraha 9.0