आष्टी
Sumit Wankhade आ. सुमित वानखेडे यांनी आपल्या कामातून नागरिकांवर भुरळ घातली आहे. आर्वी मतदार संघात अभिनव उपक्रमांचे आयोजन होऊ लागले आहे. गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आमदार आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आष्टी तालुयात राबवण्यात येत असुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावकर्यांनी हे अभियान डोयावर घेतले आहे.
आ. सुमित वानखेडे आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याद्वारे ७० गावातील समस्या सुकर करण्यासाठी पुढे सरसावले असून हाती घेतलेल्या आमदार आपल्या दारी या अभिनव व नाविन्यपूर्ण संकल्पनेतून या अभियानाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून जनतेच्या ताटकळत असलेल्या समस्या या उपक्रमाद्वारे निकाली काढण्याचा प्रयत्न यानिमित्ताने आ. वानखेडे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करीत आहेत. या उपक्रमातून गाव खेड्यातील ग्रामस्थांचे विविध कार्यालयातील अडलेले प्रश्न मार्गी लागणार आहे. याकरिता समस्या निराकरण शिबिराचे आयोजन केले जात आहे. आ. वानखेडे यांनी कल्पकतेतून नागरिकांचे शासकीय कार्यालयातील प्रलंबित असलेले प्रश्न त्यांच्या घरपोच व शिबिराच्या माध्यमातून सुकर
करण्यासाठी तालुयातील गावातून सुरुवात केली आहे. शासनाच्या विभिन्न योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे तसेच नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्या समस्या तत्काळ निकाली काढणे हा या अभिनव उपक्रमाचा उद्देश असल्याचे आ. वानखेडे यांनी सांगितले. या शिबिरात तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, स्वस्त धान्य पुरवठा विभागाचे अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, संजय गांधी निराधार योजना व स्वस्त धान्य पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अनेक वर्षापासून नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांचे त्यांनी या शिबिरात ऑन द स्पॉट निराकरण केले.
आमदार आपल्या दारी या अभिनव उपक्रमाद्वारे नागरिकांनी तत्काळ रहिवासी उत्पन्न व जातीचे प्रमाणपत्र सोबतच रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मंजुरी प्रमाणपत्र आदींचे वाटप करण्यात आले. तळेगाव शिबिरानंतर पुढे होऊ घातलेल्या सर्कल निहाय शिबिरांमध्ये समस्याग्रस्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका भाजप अध्यक्ष सचिन होले यांनी केले आहे.
आष्टी तालुयातील तळेगाव येथून आमदार आपल्यादारी या अभिनव उपक्रमास सुरुवात झाली असून सदर शिबिराच्या आयोजनातून शासनाच्या सर्व सेवा विविध विभागाच्या तक्रारींचे निराकरण एकाच ठिकाणी ऑन द स्पॉट होणार आहे. यापुढे सर्कलनुसार आमदार आपल्रूा दारी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी आपल्या समस्या सेाडविण्यासाठी पुढे यावे, असे आ. वानखेडे यांनी सांगितले.