नागपूर,
Rashtrasant Tukdoji Maharaj गणपती हनुमान मंदिर, हावरापेठ येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली कार्यक्रम झाला. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी काकड,आरती भुपाळी गायन आणि ध्यान साधनेने झाली. हावरापेठ काकड आरती मंडळाने राष्ट्रसंतांच्या भजनाचे गायन सादर करून श्रद्धांजली अर्पण केली. Rashtrasant Tukdoji Maharaj या सोहळ्यात प्रमुख पाहुणे तुळशीराम गायकवाड, महादेव बांते, मोरेश्वर बांगडे, बाळकृष्ण हातागडे, ॲड. रमेश गवडी उपस्थित होते. तसेच रामेश्वर बांगडे, प्रशांत कामठे, गजानन बांते, रघटाटे यासह अनेक गुरुदेव भक्त उपस्थित होते.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र