वाशीम,
Purushottam Dingolia case खोटी अॅट्रासिटी संदर्भात वाशीम न्यायालयाने ऐतिहासीक निर्णय देत तक्रारदाराला २ लाख रुपयांचा नुकसान भरपाई दंड ठोठावला.सदर प्रकरणात वादी पुरुषोत्तम विश्वनाथ डिंगोलिया यांच्या तर्फे वाशीमचे ज्येष्ठ विधिज्ञ सुधिर दा.मोरे यांनी काम पाहिले. डिंगोलिया हे पोलिस विभागात कार्यरत होते. व्यक्तिगत पैशाच्या देवाण घेवाणीवरून त्यांचे पोलिस विभागातील त्यांच्या एका सहकार्याशी मतभेद झाले. सदर सहकार्याने डिंगोलिया यांच्यावर अॅट्रासिटी अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला.
अॅड. सुधिर मोरे यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने डिंगोलिया यांना अॅट्रासिटी प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. त्यानंतर डिंगोलिया यांनी त्यांच्यावर खोटी अॅट्रासिटी दाखल केल्यामुळे जो मानसिक,आर्थिक त्रास झाला त्यासाठी वाशीम न्यायालयात नुकसान भरपाई दावा दाखल केला. डिंगोलिया यांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. न्यायालयाने या प्रकरणात खोटी अॅट्रासिटी दाखल केल्याचे स्पष्ट केले.
खोट्या अॅट्रॉसिटीमुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होत असून न्यायालयाच्या या निकालाने खोट्या अॅट्रॉसिटीची प्रकरणे दाखल करण्याचे प्रमाण कमी होईल यात शंका नाही. या प्रकरणात अभ्यासपूर्ण मांडणी करणारे वकील सुधिर मोरे हे अनुसूचित जातीचे आहेत. त्यामुळे इथे संविधानाचे राज्य असून, सामाजिक समरसतेचा संदेश समाजात गेला आहे. त्यामुळे अॅड. सुधिर मोरे यांचे कौतुक होत आहे.