यवतमाळ,
tennis players selected क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तथा वाशीम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 2025-26 च्या अमरावती विभागीय लॉन टेनिस स्पर्धा 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी वाशीम येथे पार पडल्या. यामध्ये मुलींच्या गटात यवतमाळ जिल्ह्यातील तीन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यात 19 वर्षे वयोगटात ध्रुवी श्याम हुलके (यवतमाळ), 17 वर्षे वयोगटात गौरी अनिल राठोड (पुसद) व 14 वर्षे वयोगटात ज्ञानदा गिरीश टोपरे (यवतमाळ) यांचा समावेश आहे. त्या आपल्या यशाचे श्रेय पालक, क्रीडा मार्गदर्शक आणि शिक्षकांना देतात. निवड झालेल्या खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.