‘साहेब, गरीबांच्या ‘आनंदाचा शिधा’ कुठे हरवला..?’

12 Oct 2025 19:22:50
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Anandacha Shidha scheme गरीब घटकास भूक भागवण्याकरिता अन्नधान्य मिळावे, याकरिता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रेशन दुकानातून रेशनकार्डधारकांना नियमित तांदूळ, गहू, डाळ व सणाच्या दिवसांत आनंदाचा शिधा वितरण केले जात असे. परंतु गेल्या दीड वर्षापासून रेशन दुकानातून लाभार्थ्यांना फक्त गहू, तांदूळ मिळत असून आनंदाचा शिधा, डाळ, साखर बेपत्ता झाली आहे.यामुळे गरिबीखाली जीवन जगणारी निराधार जनता त्रस्त झाली असून पुढील येणाèया सणांसाठी आनंदाचा शिधा मिळणार काय, या आशेने लाभार्थी प्रतीक्षा करीत आहेत.
 

Anandacha Shidha scheme 
राळेगाव तालुक्यात 114 रास्त भाव दुकानांमधून प्राधान्यचे 16 हजार 279 व अंत्योदय गट योजनेचे 7 हजार 639 असे एकूण 22 हजार 918 लाभार्थी आहेत. या सर्वांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने सण उत्सवकाळात ‘आनंदाचा शिधा’ योजनेतून रास्त दुकानातून गोरगरिबांना 100 रुपयांत शिधा दिला जात होता. यामुळे यामुळे गोरगरीब जनता दसरा-दिवाळीत गोडधोड करून खात होते.
 
 
परंतु Anandacha Shidha scheme  मागील दीड वर्षापासून आनंदाच्या शिधाला ‘ब्रेक’ लागल्याने गोरगरिबांनी शासनाच्या या योजनेविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. आता फक्त गहू आणि तांदूळ रेशन दुकानात मिळत आहे. यामुळे सामान्य जनतेला इतर महागडी साखर, तेल, डाळ दुकानातून विकत घ्यावी लागत आहे.आता तर मागील महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानात गव्हाऐवजी ज्वारी मिळत असल्याने गरिबांच्या सणावर आणखीनच विरजण पडले आहे. गरिबांना गहू विकत घ्यावे लागणार आहेत. यामुळे आणखीनच नाराजी व्यक्त होत आहे.

आनंदाचा शिधा अचानक बंद का झाला ?
लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ किटमार्फत 100 रुपयांत साखर, पामतेल, रवा, मैदा व तूरडाळ प्रत्येकी एक किलोच्या किटमध्ये हा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जात होता. त्यानुसार 2022 पासून दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती या सणांत दिला जात होता. 2024 पर्यंत हा शिधा मिळाला त्यानंतर मात्र शिधा मिळणे बंद झाले असून शासनाने संबंधित विभागाला तो बंद झाल्याचा कुठलाही निर्णय कळवलेला नाही. त्यामुळे अचानक आनंदाचा शिधा बंद का झाला, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. डॉ. आंबेडकर जयंती, गौरी, गणपती, दसरा आधी झाले असले तरी दिवाळीत तरी शासनाने ‘आनंदाचा शिधा’ द्यावा, अशी मागणी गरीब कुटुंबांची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0