जिप कर्मचाऱ्यांचे कोल्हापुरात ‘लोहपुरुष’ यश

12 Oct 2025 18:45:50
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Ironman Half Triathlon, सातत्याने केलेलेे प्रयत्न आणि जिद्द असेल, तर वयाच्या 50 व्या वर्षीही मोठे यश संपादन करता येते, याचा आदर्श यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कर्मचारी मिलिंद प्रभाकर सोळंके यांनी घालून दिला आहे.मागील वर्षीच्या 3 किमी समुद्री जलतरण स्पर्धेत राज्याच्या सर्व जिप कर्मचाèयांत एकमेव स्पर्धक म्हणून यशस्वी ठरल्यानंतर, त्यांनी आता कोल्हापूर येथे रविवार, 5 ऑक्टोबर रोजी आयोजित लोहपुरुष हाफ आयर्न ट्रायथलॉनमध्ये राज्य उपविजेते होण्याचा बहुमान मिळवला आहे.मिलिंद सोळंके यांनी मागील वर्षी मालवण येथील अरबी समुद्रात झालेल्या कठीण जलतरण स्पर्धेत 3 किमीचे सागरी अंतर केवळ 1 तास 13 मिनिटांत पार करून यश मिळवले होते.
 

Ironman Half Triathlon,  
यावेळी संपूर्ण राज्यातून हे सागरी अंतर यशस्वीरित्या पूर्ण करणारे ते एकमेव जिप कर्मचारी ठरल्याने त्यांनी आपला मोर्चा लोहपुरुष ट्रायथलॉनकडे वळवला. कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी क्रीडाभारती सायकलिंग ग्रुप 3 संघाचे यशस्वी नेतृत्व केले.
या स्पर्धेत मिलिंद सोळंके यांनी स्वत: 1.9 किमी जलतरणाचा कठीण टप्पा केवळ 47 मिनिटे 30 सेकंदांत पूर्ण करून संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. त्यांच्या चमूने एकूण स्विमिंग 1.9 किमी, सायकलिंग 90 किलोमीटर आणि धावणे 21 किमीचे अंतर फक्त 6 तास 50 मिनिटे 36 सेकंदांत पूर्ण केले आणि 45 वयोगटात त्यांच्या ग्रुपने राज्यातून उपविजेत्यांचा बहुमान मिळवला.
मालवण येथे मिळालेल्या समुद्री यशाने आत्मविश्वास वाढवला. जिपतील कामासोबतच रोज सकाळी वेळेचं योग्य नियोजन करून हे यश मिळालं आहे. क्रीडाभारती सायकलिंग ग्रुप व त्या मधील सहकारी मित्र जलतरण टीममधील सर्व सहकारी मित्र व मार्गदर्शक यांनी प्रोत्साहन दिले. पुढील वर्षी माझे लक्ष्य पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा जिंकण्याचे आहे. प्रत्येक कर्मचाèयाने आरोग्यासाठी वेळ दिलाच पाहिजे.
मिलिंद सोळंके
बांधकाम विभाग, जिप यवतमाळ
Powered By Sangraha 9.0