तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Arjun Singh Dalwala : यवतमाळ जिल्हा राजपूत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, दालमिल व ऑईल मिल संघटना, यवतमाळचे पूर्वाध्यक्ष अर्जुनसिंह त्र्यंबकसिंह दालवाला (बैस) यांचे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी उषादेवी, भाऊ कृष्णकुमारसिंह, शैलेंद्रसिंह व विक्रमसिंह ही मुले, मंजुश्री अनिल सेंगर ही मुलगी आणि खूप मोठा चाहता वर्ग आहे.
अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्वाचे धनी, अर्जुनसिंह आपल्या आगळ्यावेगळ्या राहणीमान व शैलीदार नृत्यासाठी परिचित होते. त्यांनी अनेक वस्तूसंग्रहाचा छंद जोपासला. त्यात प्रामुख्याने काचेच्या बाटल्या, पेन, टोप्या, सिगरेट लायटर यांचा समावेश आहे.
कबड्डी या खेळावर त्यांचे विशेष प्रेम होते. खेळाडूंचे मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्या प्रोत्साहन कलेसाठी त्यांना अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये ‘उत्कृष्ट दर्शक’ म्हणून पुरस्कृत करण्यात आले होते.