तभा वृत्तसेवा भंडारा,
Bhandaara cooker blast शारदा उत्सवात महाप्रसाद दरम्यान कूकरचा स्फोट होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना आज 12 रोजी भंडारा येथील बैरागीवाडा परिसरात घडली.
शहरातील बैरागी वाडा परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या शेजारी शारदा देवीची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादासाठी 40 लिटरच्या कूकरमध्ये प्रसाद शिजविला जात होता. दरम्यान कूकर थंड होण्याआधीच तो उघडण्याचा प्रयत्न होत असतानाच त्याचा प्रचंड स्फोट झाला. यावेळी आजूबाजूला असलेले पाच ते सहा जण जखमी झाल्याचे समजते. यात एका लहान मुलाचा चेहरा भाजल्याचे समजते.