महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने निर्मित केलेले हे सुमारे ९०० पानी दोन खंडांचे ग्रंथ प्रकाशन समारंभ एस.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी संपन्न झाला. history-of-hindustani-classical-music संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री. मोरे म्हणाले, “संगीताच्या इतिहासाविषयी अनेक आख्यायिका लिहिल्या गेल्या, पण या ग्रंथाच्या माध्यमातून सातशे वर्षांचा विश्वासार्ह आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त असा इतिहास आता उपलब्ध झाला आहे. याच काळातील वाद्यसंगीताचाही सविस्तर इतिहास लिहिण्याची गरज आहे.”
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, “गायनाच्या इतिहासावर आधारित हा एक मौलिक ग्रंथ ठरला आहे. मंदिरांच्या शिल्पांवरील विविध वाद्यधारी सूरसुंदरींच्या संदर्भातही अशा प्रकारचा अभ्यास व्हावा.” तर डॉ. विकास कशाळकर यांनी नमूद केले, “२०-२५ जणांनी करावयाचे संशोधनपर काम एकट्याअंजली मालकर यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मराठी भाषेत सातशे वर्षांचा इतका विस्तृत आणि संशोधनाधारित इतिहास प्रथमच वाचकांसमोर आला आहे. history-of-hindustani-classical-music प्रबंधगायकीपासून ख्यालपर्यंतच्या सर्व शैलींचा सविस्तर ऊहापोह या ग्रंथात उदाहरणांसह करण्यात आला आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस लेखिका अंजली मालकर यांनी या ग्रंथनिर्मितीचा प्रवास आपल्या मनोगतातून उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या, “मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत बदलणाऱ्या संगीत प्रवाहांना एका सूत्रात गुंफता आले, हे या लेखनाचे मोठे समाधान आहे.” ग्रंथनिर्मितीत योगदान देणारे विजय जोशी (मुद्रणशोधन), प्रभाकर भोसले (मुखपृष्ठ रचना), ऋचा कुलकर्णी आणि मानसी परशुरामकर (शब्दसूची), तसेच सहाय्यक अंजली दाणी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन स्वरदा कुलकर्णी यांनी केले, तर यमाजी मालकर यांनी आभार प्रदर्शन केले. history-of-hindustani-classical-music या कार्यक्रमास निर्मला गोगटे, डॉ. हरी सहस्त्रबुद्धे, राम कोल्हटकर, ‘मनशक्ती’चे गजानन केळकर, भारतीय विद्याभवनचे नंदकुमार काकिर्डे, भारती विद्यापीठाचे शारंगधर साठे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.