तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Brahmavadini Sakhi Manch आद्य ब्रह्मवादिनी सखी मंचचा गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी भुलाबाई कार्यक्रम पार पडला. मंचाच्या संस्थापक वृषाली शिलेदार आणि यवतमाळ जिल्हा पालक जयश्री धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने या मंचाची यवतमाळात भुलाबाई कार्यक्रमाद्वारे मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यात प्रथम दीपप्रज्वलनानंतर भुलाबाईचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिलांचा परिचय, प्रास्ताविक आणि भुलाबाई व कोजागरीचे धार्मिक व वैज्ञानिक महत्व सांगितले. भुलाबाईची गाणी व खेळ खेळल्या गेले. शेवटी खिरापत व दूध वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन स्वाती गोडसे, तर प्रास्ताविक विनिता गद्रे यांनी केले. प्रमुख पाहुणे हेमा गोसावी यांनी भुलाबाई व कोजागरी पौर्णिमेचे धार्मिक व वैज्ञानिक महत्व विषद केले. भारतातील वेगवेगळ्या राज्यांत हा सण कसा साजरा करतात, याबद्दल सविस्तर माहिती गोसावी यांनी अतिशय सोप्या शब्दांत दिली.
आभारप्रदर्शन पल्लवी व्यास यांनी केले. यासाठी शुभांगी पांडे, अश्विनी वडनेरकर, नीता भगत, मंजूषा वैद्य, मैथिली कुळकर्णी व रसिका मोकासदार यांचे विशेष सहकार्य लाभले.