समाज संघटित झाला तरच समस्यांचे निराकरण : डॉ. अरविंद देशमुख

12 Oct 2025 19:41:00
आर्वी,
Dr. Arvind Deshmukh राष्ट्रातील नागरिक बलवान व राष्ट्र शती संपन्न असले पाहिजे समाज बलवान झाला तरच अन्यायाचा प्रतिकार करू शकतो. वैभवशाली व संपन्न असलेले राष्ट्र जेव्हा पराभूत व गुलामगिरीच्या मानसिकतेत गेले तेव्हा स्वतःचे सत्व व पुरुषार्थाची ओळख करून हिंदू समाजाला संघटित व त्यांच्यातील स्नेहभाव दृढ होऊन हिंदू संस्कृतीचे संरक्षण व्हावे. समाज संघटित झाला तरच समस्येचे निराकरण होऊ शकते त्यामुळे सामान्य माणसाला एकत्र करून संघटन निर्माण करण्याची कार्य शंभर वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून सुरू केले असे प्रतिपादन विदर्भ प्रांत सामाजिक समरसता साहित्य परिषदचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केले.
 

RSS,Dr. Arvind Deshmukh, speech, 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर्वी नगराच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रविंद्र सोनटक्के होते तर आर्वी तालुका संघ चालक रमेश नागोसे यांची व्यासपिठावर उपस्थिती होते.डॉ. अरविंद देशमुख पुढे म्हणाले, विजयादशमी उत्सव म्हणजे हिंदू संस्कृतीचा पराक्रमाचा इतिहास आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासी बांधवांना एकत्रित करून दृष्ट शक्ती म्हणजेच रावणावर विजय प्राप्त केला. श्रीरामांचा तो विजय केवळ रावणावर नव्हे तर सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर अहंकारावर होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामूहिक विजयाचा उत्सव म्हणजेच हिंदू बांधवांच्या एकत्रीकरण आणि शक्तीचा गजर आहे. दुर्बल राहणे गुन्हाच, हिंदूंनी सशक्त आणि एकत्रित होऊन राष्ट्र निर्माण कार्यात आपले योगदान देणे आवश्यक आहे. राष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल व विश्व गुरू बघायचे असेल तर जीवनातील तण, मन, धन जेवढे शय असेल तेवढे भारत मातेला देण्याचा संकल्प या विजय दशमी उत्सवानिमित्त आपण सर्वांनी केल्यास भारताला गतवैभव प्राप्त होईल, असे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी हा सण संस्कृती व राष्ट्रभक्तीच्या उत्सव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रप्रेम, सेवा कार्य,शिस्त व संस्कृतीचे बीज या शंभर वर्षांमध्ये रुजवले. संघाचे १०० वर्षांचे समाजिक योगदान हे सदैव मातृभूमीच्या सेवेकरिता समर्पित असून संघ समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, स्वदेशी, पर्यावरण, गोसेवा, आदिवासी विकास, संस्कृती जपण्याचे कार्य केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशांमध्ये ओळख आहे असे सांगितले.
उत्सवापूर्वी शहरातील प्रमुख मार्गाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंंचलन केले. सांघिक गीत महेंद्र गोमासे, सुभाषित विक्की गुल्हाने, अमृत वचन पंकज गोडबोले, वैयक्तिक गीत श्रीकांत पेंडके, संचालन व आभार हर्षल देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला स्वयंसेवक, समाजसेवक, व्यापारी वर्ग,ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0