नागपूर,
chandrashekhar bawankule जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. जास्तीत-जाक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर महिन्याला हा उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना महसूल मंत्री तथा चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तथा युवा फाउंडेशन व नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल विदर्भच्या वतीने महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे ‘पालकमंत्री रोजगार मेळाव्या ते बोलत होते. यावेळी कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.
मेळाव्यात १३६ उमेदवारांना नियुक्तीपत्र
रोजगार मेळावा आयोजन समितीने यापूर्वी आयोजित केलेल्या पहिल्या रोजगार मेळाव्यात १३६ उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली होती. उपक्रमातील आजचा हा दुसरा मेळावा असून युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल,असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला रोजगार मेळावा आयोजित करून जास्तीत-जास्त उपलब्ध करून द्यावा व पुढील रोजगार मेळाव्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. मेळाव्यात सहभागी कंपन्याच्या प्रतिनिधींचे आभार मानत यापुढेही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री रोजगार मेळाव्यासाठी एक हजार युवक-युवतींनी नोंदणी केली. यातील ५०० जणांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन विविध क्षेत्रातील १६ मुलाखती दिल्या. १०० पेक्षा जास्त उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
पालकमत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पट्टेवाटप
या कार्यक्रमातच महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील नांदा गावातील २० पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आले.