अनिल कांबळे
नागपूर,
fake signature case जमिनीच्या बदल्यात फफ्लॅट देण्याची बतावणी करून ताे न देता, जमिनीची माहिती मिळवण्यासाठी एका बिल्डरने चक्क माजी पाेलिस आयुक्त अंकुश धनविजय यांची बनावट स्वाक्षरी, ई-मेलआयडी आणि जुन्या आधारकार्डचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पाेलिसांनी बिल्डरविराेधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण वाल्दे (रा. दादा धुनीवाले चाैक, जुना बगडगंज) असे आराेपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश धनविजय यांची माैजा वागदरा (गुमगाव) हाॅटेल ले-मॅरिडियन हाॅटेलजवळ चार एकर शेती आहे. ही जमीन अकृषक गटात असल्याने त्यांना प्रवीण वाल्दे याने संपर्क केला. यावेळी त्याने जमीनीच्या बदल्यात त्यांना स्वतःच्या निर्माणीधीन अपार्टमेंटच्या स्कीममध्ये थ्री बीएचके फफ्लॅट देण्याची बतावणी केली. त्यावरून त्यांनी 2023 साली वालदे याला हस्तांतरण करारपत्र तयार करून दिले. त्यानंतर बांधकाम करण्यास सुरुवात केली.
करारात नमूद असल्याप्रमाणे त्यांना अडीच वर्षात फफ्लॅट देणे बंधनकारक हाेते. मात्र, त्यानंतरही त्याने फफ्लॅट दिला नसून अपार्टमेंटचे बांधकाम अर्धवट आहे. दरम्यान यापूर्वी 10 ऑक्टाेबर 2022 ला नागपूर सुधार प्रन्यासकडे जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी अंकुश धनविजय यांच्या खाेट्या स्वाक्षरीचा अर्ज सादर करीत, त्यावर त्यांचा बनावट ई-मेल आयडी टाकला. यासाठी लागणारे आधारकार्ड त्याने मिळवले. मात्र, या आधारकार्डवर माजी पाेलिस आयुक्तांच्या बंगल्याचा पत्ता असल्याने त्याने स्वतःनाव व पत्ता आणि माेबाइल टाकून नकाशा मिळवला. याच नकाशाच्या आधारे त्याने धनविजय यांना संपर्क करून त्यांची फसवणूक केली. दरम्यान धनविजय यांना ही जमीन अकृषक असून त्याची सध्याची किंमत दाेन काेटी 59 लाख 88 हजार रुपये असल्याचे समजले. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना कळताच, त्यांनी हिंगणा पाेलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून बिल्डरविराेधात हिंगणा पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.