तभा वृत्तसेवा आर्णी,
farmer suicide कर्जाला कंटाळून शेतकèयाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील देवगाव येथे घडली असून किसन हरी देवकर (वय 45) असे आत्महत्या करणाèया शेतकèयाचे नाव आहे.देवगाव येथील शेतकरी किसन हरी देवकर यांच्याकडे देवगाव शेत शिवारात 1.23 हेक्टर शेती आहे. यामध्ये मृतकाच्या आईसह 5 वारस आहेत. यावर्षी सर्वांच्या सहमतीने संपूर्ण शेती किसन यांनी वाहिली होती.
मात्र यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पिक गेल्याने पेरणीसाठी काढलेल्या कर्जाचीही परतफेड होणार नाही याची चिंता शेतकèयाला सतावत होती असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
यातूनच शेतकरी किसन देवकर याने गुरुवारी राहत्या घरी विषारी कीटकनाशक प्रशान केले असता कुटुंबियांनी त्यांना तत्काळ लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांकरिता दाखल कले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान शेतकèयाच्या मृत्यू झाला. मृतक शेतकरी किसन देवकर यांच्यापश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. देवगाव तलाठी वकीलहसन शेख यांनी आत्महत्येचा पंचनामा करुन आपला अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.
हुंडा छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
देऊळगाव वळसा येथील घटना
दारव्हा तालुक्यातील देऊळगाव (वळसा) येथे शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी हुंड्याच्या छळाला कंटाळून एका 21 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सकाळी उघडकीस आली. मृत विवाहितेचे नाव मीनाक्षी धनराज राठोड असून, तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि भासèयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मीनाक्षीचा विवाह 13 एप्रिल 2025 रोजी देऊळगाव वळसा येथील धनराज सजन राठोड याच्याशी झाला होता. तिचे वडील किशोर चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच मीनाक्षीला तिचा पती धनराज, सासू अनिता राठोड, सासरे सजन राठोड आणि भासरा गोपाळ राठोड यांनी हॉटेल व्यवसायासाठी माहेरहून 3 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता.
यासाठी मीनाक्षीला सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. या सततच्या छळाला कंटाळून मीनाक्षीने 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास गावातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हुंड्यासाठी होणाèया छळाचा अमानुष प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी मीनाक्षीचा पती धनराज राठोड, सासू अनिता राठोड, सासरा सजन राठोड आणि भासरा गोपाळ राठोड यांच्याविरुद्ध भादंवि कलम 80 (4), 3 (5) तसेच 1961 च्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.