जैन मंदिराचा कळस नेला कापून

12 Oct 2025 21:34:49
नवी दिल्ली,
Gold Urn Stolen : गेल्या महिन्यात 3 सप्टेंबर रोजी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ जैन सममुदायाच्या मिरवणुकीच्या दरम्यान, जवळपास दीड कोटी किमतीचा सोन्याचा कलश चोरीला गेला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच, दिल्लीतीलच ज्योती नगरमधील आणखी एका जैन मंदिराचा कळस चोरट्यांनी कापून नेल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री जेव्हा सर्वजण करवा चौथ साजरी करीत होते, तेव्हाच ही चोरी झाली आहे.
 
 
DELHI
 
 
 
अष्टधातूच्या या कळसातील फक्त सोन्याची किंमत 50 लाखांवर असल्याचे सांगितले जात आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. दरम्यान, या घटनेचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले असून, चोरटा मंदिरावरून कळस घेऊन उतरताना आणि अंधाराचा फायदा घेऊन पळताना दिसतो आहे. मंदीरावर कळस नसल्याची बाब शनिवारी सकाळी मंदिराच्या कर्मचाèयाच्या लक्षात आली आणि या चोरीचा उलगडा झाला.
 
 
तपास करणाèया पोलिसांच्या मते, चोरी करणाèयाला मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण माहिती होती. पोलिसांची अतिरिक्त चमू या चोरट्याच्या मागावर असून, लवकरात लवकर कळसाची पुनर्स्थापना करण्यात येईल, असा विश्वास मंदिर व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0