देवळी,
Ramdas Tadas येथील विदर्भ केसरी श्री रामदास तडस क्रीडा अकादमीला चांगले प्रशिक्षक नेमून कुस्तीगीर घडविणार आहे. एसएमडब्ल्यू प्रा. लि. देवळी या कंपनीने सुद्धा सी. एस. आर. फंडातून खेळाडूंना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून देवळी येथे सेंटर मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी व कुस्तीपटूंचा आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. नरेंद्र मदनकर, दिलीप कारोटकर, रवी कारोटकर, उमेश कामडी, कविश सुरकार, शुभम तर्हेकर, सुनील येळणे, रवींन्द्र पोटदुखे, सुनील काकडे उपस्थित होते.
संकेत येळणे या विद्यार्थ्याने अत्यंत कठीण व गरिबीच्या परिस्थीतीतून नीट परिक्षेत जास्त गुण घेऊन धुळे येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवला त्याचे अभिनंदन तसेच विदर्भ केसरी श्री रामदास तडस क्रीडा अकादमी येथील नियमित सराव करणारे पहेलवान यश पोटदुखे याची शालेय १७ वर्षाखाली नागपूर विभागातून ९२ वजन गटातून राज्यस्तरावर निवड झाली असून तो आता रायगड राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सहभागी होणार आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथून महिला पहेलवान गौरी चौधरी ही ६५ वजन गटातून कलर होल्डर झाली असून ती कोटा राजस्थान येथे ऑल इंडिया नॅशनल स्पर्धा खेळायला जाणार आहे. या सर्वांचा रामदास तडस यांनी सत्कार केला.