मालेगाव,
Malgaon municipal मालेगाव नगरपंचायत च्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड प्रमाणात घोळ झाला असून असंख्य मतदारांची नावे वास्तव्यात असलेल्या प्रभागातून वगळण्यात येऊन इतर प्रभागातील यादीत समाविष्ट करण्यात आल्याने प्रारूप मतदार यादीची दुरुस्ती करून देण्याची मागणी व त्याबाबतचे आक्षेप भाजपा नेते डॉ. विवेक माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले असून मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांना आक्षेपासह पत्र दिले आहे.
नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता शहरातील सतरा प्रभागातील मतदार यादी प्रसिद्धी झाली आहे. मतदार यादी प्रसिद्धीनंतर १७ ही प्रभागातील मतदार यादीत प्रचंड प्रमाणात घोळ दिसत असून, प्रत्येक प्रभागातील असंख्य मतदारांची नावे त्यांच्या प्रभागा ऐवजी इतर प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यात उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक दोन या प्रभागात राहत असणार्या १०० ते १५० मतदारांची नावेही प्रभाग क्रमांक दोनच्या यादीत नसून, शहरातील इतर वेगवेगळ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहे अशाच प्रकारचा घोळ शहरातील इतर प्रभागात सुद्धा झालेला आहे त्यामुळे याबाबतचा आक्षेप घेत तसे पत्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत मालेगावचे निलेश गायकवाड यांना देण्यात आले आहे तसेच या पत्रात त्यांनी वस्तूस्थिती मांडली असून प्रारूप मतदार यादीत बदल बाबत दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे.
यावेळी भाजपा नेते डॉ. विवेक माने, संतोष तिखे, तालुका सरचिटणीस किशोर महाकाळ, भाजपा शहर अध्यक्ष संतोष घुगे, संदीप पिंपरकर शेख मुदसिर, विनोद बानाईकर, राहुल गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले असता मुख्याधिकारी यांनी शहरातील झालेल्या प्रारूप मतदार यादीतील बदल बाबत दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.