"जागर शारदेचा" अंतर्गत मेंहदी रंगोत्सव उत्साहात साजरा

12 Oct 2025 19:49:40
नागपूर,
Nitin Gadkari शारदेच्या आगमनानिमित्त नागपूर शहरात सांस्कृतिक उत्सवाची रंगीत सुरुवात झाली आहे. खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने "जागर शारदेचा" या कलेच्या देवता श्री शारदेच्या सन्मानार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतून कला, संस्कृती व परंपरांचा प्रचार होण्याबरोबरच उत्सवाची आध्यात्मिक व सांस्कृतिक ऊर्जा वाढविण्याचा उद्देश आहे.
 
nagpur
 
या महोत्सवाच्या भाग म्हणून आयोजित मेंहदी रंगोत्सव कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने विविध संस्था व मंडळांना मेहंदी आर्टिस्ट पाठवून कार्यक्रम अधिक रंगतदार करण्यात आला. कार्यक्रमात १५४ महिलांनी मेहंदी लावून सहभाग घेतला. Nitin Gadkari आयटी सेल अध्यक्ष रुपल दोडके यांनी सांगितले की, "या कार्यक्रमाने शारदोत्सवाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण झाली असून, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महोत्सव यशस्वी ठरेल."
 
माजी नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, महामंत्री वंदना शर्मा, मंडळ अध्यक्ष अंजली देशपांडे, उपाध्यक्ष स्वाती फडणवीस, डॉ. अश्विनी नाशिककर आणि कल्याणी सोळंके यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. Nitin Gadkari त्यांनी महिलांसोबत मेहंदी लावून कार्यक्रमाला विशेष वैशिष्ट्य दिले. खासदार गडकरी यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने शारदोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठे नियोजन केले असून, येत्या काळात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. या महोत्सवामुळे नागपूरकरांमध्ये सांस्कृतिक जागृती वाढल्याचे दिसून येत आहे.
सौजन्य: रूपल दोडके, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0